मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /पीटी उषा यांनी घडवला इतिहास, IOAच्या अध्यक्षपदी निवड होणारी पहिली महिला

पीटी उषा यांनी घडवला इतिहास, IOAच्या अध्यक्षपदी निवड होणारी पहिली महिला

भारताची दिग्गज महिला धावपट्टू पीटी उषा यांची शनिवारी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या नियुक्ती करण्यात आली. पहिल्यांदाच एका महिलेची भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

दिल्ली, 10 डिसेंबर :  भारताची दिग्गज महिला धावपट्टू पीटी उषा यांची शनिवारी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या नियुक्ती करण्यात आली. पहिल्यांदाच एका महिलेची भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली. आशियाई खेळात अनेक पदके जिंकलेल्या आणि 1984  मध्ये लॉस एंजिलिस ऑलिम्पिक स्पर्धेत 400 मीटर अडथळ्याच्या शर्यतीत पीटी उषा या चौथ्या स्थानी राहिल्या होत्या. पीटी उषा यांची निवड बिनविरोध झाली.

सर्वोच्च न्यायालयाकडून नियुक्त करण्यात आलेले माजी न्यायाधीश नागेश्वर राव यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक पार पडली. पीटी उषा यांची अध्यक्षपदावरून भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये गटबाजीच्या राजकारणामुळे निर्माण झालेलं संकटही दूर झालं. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने निवडणूक न झाल्यास भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला होता. आयओएची निवडणूक डिसेंबर 2021 मध्ये होणे अपेक्षित होते.

हेही वाचा : पदार्पणानंतर 12 वर्षांनी टीम इंडियात खेळणार गोलंदाज, BCCIने दिली संधी

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी अर्ज करणाऱ्या पीटी उषा या एकमेव उमेदवार होत्या. पीटी उषा यांना जुलै महिन्यात भाजपने राज्यसभेवर पाठवलं होतं.  तर भारताच्या राष्ट्रीय रायफल असोसिएशनच्या अजय पटेल यांची बिनविरोध उपाध्यक्षपदी निवड झाली. याशिवाय ऑलिम्पिक विजेता नेमबाजपट्टू गगन नारंग आणि भारतीय रोइंग महासंघाच्या अध्यक्ष राजलक्ष्मी सिंह देव यांचीही उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

First published:

Tags: Olympic