मुंबई, 19 मार्च : पाकिस्तान सुपर लीगच्या अंतिम सामन्यात लाहोर कलंदर्सने मुल्तान सुल्तान्सला एका धावेने पराभूत करत रोमहर्षक विजय मिळवला. पीएसएलचे खेळाडू इंडियन प्रीमियर लीगपेक्षा आमची लीग चांगली असल्याचा दावाही करतात. इंडियन प्रीमियर लीग ही जगातली सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे. आता आयपीएलच्या धर्तीवर महिला प्रीमियर लीगही सुरू आहे. दरम्यान, पीएसएलच्या विजेते आणि उपविजेत्यांना मिळालेल्या बक्षीसाच्या रकमेची चर्चा सध्या होत आहे. यावरून पाकिस्तानला ट्रोलही केलं जात आहे.
शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली लाहोर कलंदर्सने पीएसएलचे विजेतेपद पटकावले. विजेत्या संघाला १२० मिलियन पाकिस्तानी रुपये देण्यात आले. तर मोहम्मद रिजवानच्या उपविजेत्या संघाला ४८ मिलियन मिळाले. सलग दुसऱ्यांदा लाहोर कलंदर्सने पीएसएलचं विजेतेपद पटकावलंय. त्यांना मिळालेली रक्कम भारतीय रुपयांमध्ये ३.६ कोटी रुपये इतकी आहे तर उपविजेत्यांना १.५ कोटी रुपये मिळाले.
सेहवागच्या जागी संधी मिळताच केलं सोनं, BCCIने बंदीही घातली, कुठे आहे गांगुलीचा खास खेळाडू?
महिला प्रीमियर लीगच्या लिलावात एकट्या स्मृती मानधनाला आरसीबीने ३.४ कोटी रुपये मोजून संघात घेतलंय. ही रक्कम पीएसएलमध्ये विजेत्या संघाला मिळणाऱ्या रकमेइतकी आहे. आयपीएल विजेत्यांना गेल्या हंगामात २० कोटी रुपये आणि राजस्थान रॉयल्सला १३ कोटी रुपये मिळाले होते.
लाहोर कलंदर्सने अखेरच्या चेंडूवर एका धावेने मुल्तान सुल्तान्सला हरवलं. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी मुल्तानला ४ धावा हव्या होत्या. जमान खानच्या चेंडूवर खुशदिल शाह २ धावाच काढू शकला. लाहोर कलंदर्सने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद २०० धावा केल्या होत्या. तर मुल्तान सुल्तान्सचा संघ १९९ धावा करू शकला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket