मुंबई, 19 मार्च : क्रिकेटमध्ये टॅलेंटसोबतच नशिबाचीही महत्त्वाची भूमिका असते. एखाद्या खेळाडुची दुखापत ही एखाद्यासाठी संधी बनते. त्याचं नशीब चमकतं आणि करिअर होऊन जातं. भारतीय क्रिकेटमध्ये दिनेश मोंगिया असाच खेळाडू आहे ज्याला सौरव गांगुली कर्णधार असताना वीरेंद्र सेहवागला दुखापत झाल्यानंतर संधी दिली होती. दिनेश मोंगियाला सेहवाग दुखापतीने बाहेर झाल्यानं ओपनिंगची संधी मिळाली होती.
झिम्बॉब्वेविरुद्ध दिनेश मोंगियाने १५९ धावांची खेळी केली होती. त्या कामगिरीच्या जोरावर त्याला व्हीव्हीएस लक्ष्मणच्या जागी २००३च्या वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळालं होतं. मात्र, त्याला पुन्हा कधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक करता आलं नाही. मोंगियाला भारताकडून ५७ एकदिवसीय सामने खेळण्याची संधी मिळाली. यात त्याने एक शतक आणि ४ अर्धशतकांसह १२३० धावा केल्या. पंजाबकडून घरेलू क्रिकेट खेळणाऱ्या दिनेशला भारताच्या कसोटी संघात खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, घटस्फोटानंतर वयाने लहान खेळाडूला करतेय डेट
दिनेश मोंगियाने पंजाबकडून १९९५-९६ मध्ये पदार्पण केलं. ४-५ वर्षे घरेलू क्रिकेटमध्ये धावा केल्यानंतर त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली. परदेशात त्याची बॅट तळपली नाही. त्यामुळे संघात सतत स्थान मिळवता आलं नाही. २००३ च्या वर्ल्ड कपमधून त्याने पुनरागमन केलं, पण फारशी चमक दाखवता आली नाही. त्यानतंर दिनेश मोंगिया पुनरागमनासाठी काउंटी क्रिकेट खेळला. त्यातही तो अपयशी ठरला. २००७ मध्ये त्याने भारताकडून अखेरचा सामना खेळला.
बीसीसीआयच्या विरुद्ध गेल्यानं इंडियन क्रिकेट लीगमध्ये दिनेश मोंगिया खेळला होता. यामुळे त्याच्यावर बीसीसीआयने बंदीची कारवाई केली होती. तसंच आयपीएलमध्ये फिक्सिंगचे आरोपही त्याच्यावर झाले. ऑक्टोबर महिन्यात मोंगियावरील बंदी हटवण्यात आली. मात्र तो पुन्हा कधीच भारतासाठी खेळू शकला नाही.
अखेरचा सामना २००७ मध्ये खेळल्यानतंर १२ वर्षांनी दिनेश मोंगियाने २०१९ मध्ये क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. २०२१ मध्ये मोंगियाने भाजपमध्ये प्रवेश करत राजकीय मैदानात एन्ट्री केली. याशिवाय त्याने चित्रपटांमध्येही काम केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket