क्रिस गेलने केला विश्वविक्रम, या भारतीय खेळाडूला टाकलं मागे

क्रिस गेलने केला विश्वविक्रम, या भारतीय खेळाडूला टाकलं मागे

वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू क्रिस गेल (Chris Gayle) ने जगातल्या सगळ्या टी-20 लीगमध्ये त्याचा धमाका दाखवला आहे.

  • Share this:

मुंबई, 24 फेब्रुवारी : वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू क्रिस गेल (Chris Gayle) ने जगातल्या सगळ्या टी-20 लीगमध्ये त्याचा धमाका दाखवला आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्येही (PSL) गेलने सोमवारी अर्धशतक करत नवा विश्वविक्रम केला. पाकिस्तानमध्ये क्रिस गेलचं हे पहिलचं अर्धशतक आहे. गेलने आतापर्यंत 12 देशांमध्ये हा कारनामा केला आहे. जगातल्या दुसऱ्या कोणत्याच खेळाडूला हा विक्रम करता आलेला नाही.

क्रिस गेलने त्याच्या टी-20 करियरमध्ये सर्वाधिक 37 वेळा भारतात 50 पेक्षा जास्तचा स्कोअर केला आहे. पहिले गेल आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्या नावावर 11-11 देशांमध्ये हा अर्धशतक केल्याचा विक्रम होता. पण गेलने पाकिस्तानमध्ये क्वेट्टा ग्लॅडिएटर्सकडून खेळताना 68 रन केले आणि आपल्या नावावर विश्वविक्रम केला.

गेलने भारताशिवाय वेस्ट इंडिजमध्ये 20, इंग्लंडमध्ये 7, दक्षिण आफ्रिकेमध्ये 7, न्यूझीलंडमध्ये 1, ऑस्ट्रेलियामध्ये 7, झिम्बाब्वेमध्ये 3, बांग्लादेशमध्ये 11, अमेरिकेमध्ये 3, श्रीलंकेमध्ये 3, यूएईमध्ये 8 आणि पाकिस्तानमध्ये 1 वेळा 50 स्कोअर केला आहे. पण या अर्धशतकानंतरही गेलची टीम पीएसएलची मॅच हरली.

रोहित शर्माने, भारत, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका, बांगलादेश, युएई, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, आयर्लंड आणि न्यूझीलंडमध्ये अर्धशतकं केली आहे. रोहितने सगळ्यात जास्त 44 वेळा भारतातच 50 पेक्षा अधिकचा स्कोअर केला आहे.

क्रिस गेलने त्याच्या टी-20 करियरमध्ये 413 मॅच खेळून 38 च्या सरासरीने 13,691 रन केले आहेत. नाबाद 175 रन गेलची सर्वोत्तम खेळी आहे. टी-20 मध्ये गेलने 22 शतकं आणि 86 अर्धशतकं केली आहेत. एक हजारपेक्षा जास्त फोर आणि एक हजारपेक्षा जास्त सिक्स मारणारा गेल एकमेव टी-20 खेळाडू आहे. याशिवाय त्याने टी-20 क्रिकेटमध्ये 80 विकेटही घेतल्या आहेत. टीम इंडियाचा कोणताही खेळाडू टी-20 मध्ये 300 मॅचही खेळू शकला नाही.

Published by: Shreyas
First published: February 24, 2021, 9:52 AM IST

ताज्या बातम्या