कराची, 27 जानेवारी : पाकिस्तान सुपर लीगच्या (PSL) सातव्या मोसमाला गुरूवारपासून सुरूवात होणार आहे, पण पहिल्या सामन्याआधीच स्पर्धेत कोरोनाचा (Corona Virus) शिरकाव झाला आहे. पेशावर झाल्मीचा कर्णधार वहाब रियाजला (Wahab Riaz) कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर आता क्वेट्टा ग्लॅडिएटर्सचा ऑलराऊंडर शाहिद आफ्रिदीचीही (Shahid Afridi) कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. वहाब एक दिवस आधीच कोरोना पॉझिटिव्ह आला होता आणि आता तो आयसोलेशनमध्ये आहे, त्यामुळे तो शुक्रवारी आफ्रिदीच्या क्वेट्टाविरुद्ध होणारी मॅच खेळणार नाही. रियाजच्याऐवजी शोएब मलिक टीमचं नेतृत्व करेल. पीएसएलची पहिली मॅच गुरूवारी संध्याकाळी कराची किंग्स आणि मुलतान सुलतान्स यांच्यात होणार आहे. याआधी कराचीचा माजी कर्णधार इमाद वसीम आणि परदेशी खेळाडू जॉर्डन थॉम्पसनही कोरोना पॉझिटिव्ह आले. शाहिद आफ्रिदीला आता 7 दिवस आयसोलेशनमध्ये राहावं लागणार आहे. यानंतर निगेटिव्ह रिपोर्ट आला तरच आफ्रिदी पीएसएलमध्ये खेळू शकेल. कोरोना झाल्यामुळे तो पीएसएलच्या सुरुवातीच्या 4 मॅच खेळू शकणार नाही. शाहिद आफ्रिदीला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे, याआधी जून 2020 सालीही आफ्रिदीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती.
I have unfortunately tested positive but have no symptoms at all. InshALLAH hope to recover soon, test negative and rejoin QG as soon as possible. Good luck to all teams in #HBLPSL7 I'm committed to giving it my all in my last PSL edition. pic.twitter.com/wCiEb5laZS
— Shahid Afridi (@SAfridiOfficial) January 27, 2022
शाहिद आफ्रिदीने ट्वीट करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं आहे. कंबरेच्या दुखापतीमुळे त्याने पीएसएलचं बायो-बबल तोडलं होतं. बुधवारी वैद्यकीय तपासणी करण्यासाठी तो गेला होता, यानंतर त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. सध्या तो घरामध्येच आयसोलेट झाला आहे. कोरोनाचा धोका असतानाही पीएसएलच्या मॅच स्थगित होणार नसल्याचं पीसीबी आणि टीमनी ठरवलं आहे. जोपर्यंत 12 खेळाडू खेळण्यासाठी उपलब्ध असतील तोपर्यंत मॅचचं वेळापत्रक बदललं जाणार नाही.