Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Pro Kabaddi: पीकेएलमध्ये आज रंगणार दोन मॅच, यू मुंबासमोर पायरेट्सचं आव्हान

Pro Kabaddi: पीकेएलमध्ये आज रंगणार दोन मॅच, यू मुंबासमोर पायरेट्सचं आव्हान

प्रो कबड्डी लीगच्या (Pro Kabaddi League) आठव्या सिझनमध्ये आज (मंगळवार 11 जानेवारी 2022 ) दोन मॅचेस खेळवल्या जाणार आहेत. पहिली मॅच पटना पायरेट्स (Patna pirates) विरुद्ध यू मुंबा (U Mumba) यांच्यात होणार असून दुसरी मॅच तेलुगू टायटन्स (telugu titans) विरुद्ध गुजरात जायंट्स (Gujarat giants) यांच्यात होणार आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 11 जानेवारी : प्रो कबड्डी लीगच्या (Pro Kabaddi League) आठव्या सिझनमध्ये आज (मंगळवार 11 जानेवारी 2022 ) दोन मॅचेस खेळवल्या जाणार आहेत. पहिली मॅच पटना पायरेट्स (Patna pirates) विरुद्ध यू मुंबा (U Mumba) यांच्यात होणार असून दुसरी मॅच तेलुगू टायटन्स (telugu titans) विरुद्ध गुजरात जायंट्स (Gujarat giants) यांच्यात होणार आहे. पटनाची टीम 29 पॉईंट्ससह टॅलीमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. पटनानं या सिझनमध्ये आतापर्यंत सातपैकी पाच मॅचेस जिंकल्या आहेत. त्यांना फक्त एकदा पराभव स्वीकारावा लागला आहे तर एक मॅच टाय झाली आहे. यु मुंबाचा विचार केल्यास मुंबईच्या टीमनं आतापर्यंत सातपैकी केवळ तीन मॅचेस जिंकल्या आहेत. एका मॅचमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे तर तीन मॅचेस टाय झाल्या आहेत. त्यामुळे यू मुंबा 25 पॉईंट्ससह टॅलीमध्ये (Point Tally) पाचव्या स्थानावर आहे.

आजची दुसरी मॅच गुजरात जायंट्स आणि तेलुगु टायटन्समध्ये रंगणार आहे. या दोन्ही टीम सध्या खराब फॉर्ममध्ये असून पॉईंट टॅलीमध्ये एकदम तळाला आहेत. 15 पॉईंट्ससह गुजरात11व्या स्थानावर आहे. गुजरातने आतापर्यंत खेळलेल्या सात मॅचेसपैकी फक्त एकच मॅच जिंकली आहे. चार मॅचेसमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला असून दोन मॅचेस टाय (Tie) झालेल्या आहेत. दुसरीकडे, तेलुगू टायट्न्स 10 पॉईंट्ससह टॅलीमध्ये सर्वात शेवटी म्हणजे 12व्या स्थानावर आहे. टायट्न्स अद्यापही आपल्या या सिझनमधील पहिल्या विजयाच्या शोधात आहेत. आतापर्यंत झालेल्या सात मॅचेसपैकी पाच मॅच ते हरले असून 2 मॅट टाय झाल्या आहेत.

पीकेएल सिझन 8 (PKL Season 8) मध्ये आज खेळवल्या जाणाऱ्या दोन मॅचेसपैकी, पटना पायरेट्सविरुद्ध यू मुंबाची मॅच सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी तर गुजरात जायंट्स आणि तेलुगु टायटन्सची मॅच रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल. भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कनं (Star Sports Network) या प्रीमियर टूर्नामेंटच्या प्रक्षेपणाचे अधिकार मिळवलेले आहेत. टीव्ही व्यतिरिक्त 'डिझ्नी प्लस हॉटस्टार' (Disney+ Hotstar) या अॅप आणि वेबसाईटवर पीकेएलची लाईव्ह अॅक्शन पाहता येईल.

पटना पायरेट्स टीम : मोनू, मोहित, राजवीरसिंह प्रताप राव चव्हाण, जंगकुन ली, प्रशांत कुमार राय सचिन, गुमान सिंह, मोनू गोयल, नीरज कुमार, सुनील, सौरव गुलीया, संदीप, शुभम शिंदे, साहिल मान, मोहम्मदरेजा शादलोई चियानेह, साजीन चंद्रशेखर.

यू मुंबा टीम : फजल अत्राचली, अजिंक्य रोहिदास कापरे, रिंकू, अजित व्ही कुमार, मोहसिन मघसौदलू जाफरी, हरेंद्र कुमार, अभिषेक सिंह, नवनीत, सुनील सिद्धगवळी, जशनदीप सिंह, राहुल राणा, अजित, आशीष कुमार सांगवान, पंकज.

गुजरात जायंट्स टीम: परवेश भैंसवाल, सुनील कुमार, रविंदर पहल, अजय कुमार, प्रदीप कुमार, गिरीश मारुती एर्नाक, रतन के, हर्षित यादव, मनिंदर सिंह, हादी ओश्तोरक, महेंद्र गणेश राजपूत, सोनू, सुलेमान पहलवानी, हरमनजीत सिंह, अंकित, सुमित.

तेलुगु टाइटन्स टीम : राकेश गौडा, रजनीश, अंकित बेनीवाल, सिद्धार्थ देसाई, ह्यूंसु पार्क, रोहित कुमार, जी. राजू, अमीत चौहान, मनीष, आकाश चौधरी, आकाश दत्तू अरसुल, प्रिंस, अॅबे टेटसुरो, सुरेंद्र सिंह, संदीप, ऋतुराज शिवाजी कोरवी, आदर्श टी, सी अरुण.

First published:

Tags: Pro kabaddi, Pro kabaddi league