मुंबई, 27 डिसेंबर: प्रो कबड्डी लीगच्या (Pro Kabaddi League) आठव्या सिझनची रंगत वाढत आहे. या स्पर्धेतील सर्व टीमच्या किमान 2 मॅच झाल्या असून आता तिसरा राऊंड सुरू आहे. माजी विजेता यू मुंबाची (U Mumba) टीम 2 सामन्यानंतर 1 विजय आणि 1 पराभवासह 6 पॉईंट्स घेऊन पाचव्या क्रमांकावर आहे. यू मुंबाची सोमवारी लढत तामिळ थलयवाज (Tamil Thalaivas) शी होत आहे.
थलयवाजला या सिझनमध्ये अद्याप एकही विजय मिळालेला नाही. सध्या ही टीम पॉईंट टेबलमध्ये 11 व्या क्रमांकावर आहे. यू मुंबानं तामिळ थलयवाजचा पराभव करत 5 पॉईंट्सची कमाई केली तर मुंबा टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. मुंबाची भिस्त ही कॅप्टन फजल अत्रचालीच्या प्लॅनिंगवर असेल. इराणचा हा खेळाडू त्याच्या भक्कम बचावासाठी कबड्डीविश्वात प्रसिद्ध आहे. तर अभिषेक सिंहवर रेडिंगची मदार असेल.