मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Pro Kabaddi League च्या इतिहासात पहिल्यांदाच, पिता-पुत्र एकाच टीमकडून खेळणार!

Pro Kabaddi League च्या इतिहासात पहिल्यांदाच, पिता-पुत्र एकाच टीमकडून खेळणार!

Pro Kabaddi League : गेल्या काही वर्षांत देशात कबड्डीलाही (Kabaddi) क्रिकेटसारखं ग्लॅमर मिळू लागलं आहे. प्रो-कबड्डी लीगच्या इतिहासात प्रथमच एक मुलगा आपल्या वडिलांच्या नेतृत्वाखाली (Son is Playing Under Father's Captainship)  खेळणार आहे.

Pro Kabaddi League : गेल्या काही वर्षांत देशात कबड्डीलाही (Kabaddi) क्रिकेटसारखं ग्लॅमर मिळू लागलं आहे. प्रो-कबड्डी लीगच्या इतिहासात प्रथमच एक मुलगा आपल्या वडिलांच्या नेतृत्वाखाली (Son is Playing Under Father's Captainship) खेळणार आहे.

Pro Kabaddi League : गेल्या काही वर्षांत देशात कबड्डीलाही (Kabaddi) क्रिकेटसारखं ग्लॅमर मिळू लागलं आहे. प्रो-कबड्डी लीगच्या इतिहासात प्रथमच एक मुलगा आपल्या वडिलांच्या नेतृत्वाखाली (Son is Playing Under Father's Captainship) खेळणार आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 18 डिसेंबर : गेल्या काही वर्षांत देशात कबड्डीलाही (Kabaddi) क्रिकेटसारखं ग्लॅमर मिळू लागलं आहे. देशी मातीतला हा खेळ आता जागतिक पातळीवरही नावारूपाला येत आहे. क्रिकेटप्रमाणेच कबड्डीच्या लीग स्पर्धा होऊ लागल्या असून, हा खेळही आता वलयांकित झाला आहे. कोरोना साथीचा (Coronavirus Pandemic) जोर काहीसा कमी झाल्यानं आता प्रो-कबड्डी लीगच्या आठव्या पर्वाचं (Pro Kabaddi League 8th Season) आयोजन करण्यात आलं असून, यंदा यात एक विलक्षण योगायोग घडला आहे. प्रो-कबड्डी लीगच्या इतिहासात प्रथमच एक मुलगा आपल्या वडिलांच्या नेतृत्वाखाली (Son is Playing Under Father's Captainship)  खेळणार आहे. दिल्लीचे (Delhi Team) नेतृत्व करणारे अनुभवी कबड्डीपटू जोगिंदर नरवाल (Joginder Narwal) यांच्या कॅप्टनशीपमध्ये त्यांचा मुलगा विनय नरवालही (Vinay Narwal) दिल्लीसाठी खेळणार आहे. कबड्डी लीगच्या इतिहासात प्रथमच (First Time in Pro Kabaddi League History) असा योगायोग घडून आला आहे.

दबंग दिल्ली टीमचे कॅप्टन अनुभवी कबड्डीपटू जोगिंदर नरवाल यांच्याबरोबर त्यांचा मुलगा विनय नरवाल त्यांच्याच टीममधून खेळणार आहे. हा योगायोग अतिशय आनंददायी असल्याची भावना जोगिंदर नरवाल यांनी अमर उजालाशी बोलताना व्यक्त केली. टीमच्या कामगिरीवर याचा कसा परिणाम होईल, तयारी कशी सुरू आहे, याबाबतही त्यांनी माहिती दिली.

गेल्या वर्षी दिल्लीची टीम अंतिम फेरीत पोहोचली होती, मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता. यंदा दिल्लीचा हा अनुभवी कर्णधार मुलाच्या साथीने विजेतेपद पटकावण्यासाठी जीवाची बाजी लावेल. ही पिता-पुत्राची जोडी यंदा (Fater and Son Pair) काहीतरी चमत्कार घडवेल असं मानलं जात आहे. त्यासाठी यंदा काही वेगळी रणनीती आखली आहे का? असं विचारलं असता जोगिंदर नरवाल यांनी गेल्या वेळी जसा जिंकण्याच्या इर्षेने खेळ केला तसाच यंदाही करू आणि यंदा दिल्लीसाठी हे अजिंक्यपद जिंकायचे आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

गेल्या हंगामानंतर दीर्घ विश्रांतीनंतर टीम मैदानात उतरत आहे, त्याचा खेळाडूंच्या तयारीवर काही परिणाम जाणवला का? असं विचारलं असता, जोगिंदर म्हणाले की, कोरोनाच्या संकटामुळे सर्वच टीम दीर्घ काळानंतर मैदानात उतरणार आहेत. कोरोनाच्या काळातही आम्ही गावाकडे राहत असलो तरी आमचा सराव सुरू होताच. आम्ही अन्य वेगवेगळ्या टीमकरता खेळत असतोच, त्यामुळे वर्षभर आमची तयारी सुरू असतेच. आमच्या टीममधील सर्व खेळाडू एकमेकांना चांगले ओळखतात, त्यामुळे त्यांचे परस्परातील संबंध चांगले आहेत. प्रो कबड्डी लीगच्या इतिहासात दबंग दिल्लीचा डिफेन्स (Defence) सर्वात खराब असल्याचे दिसून आले, यंदा त्यासाठी काय तयारी केली आहे, असं विचारलं असता, जोगिंदर म्हणाले की, आमच्या टीमचा डिफेन्स खराब नाही, पण प्रत्येक टीमकडून कधीकधी चुका होतात, तशा आमच्याही झाल्या. रेडर आणि डिफेंडर दोघांनीही चांगला खेळ केला म्हणूनच आमची टीम अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकली होती, यंदाही आम्ही उत्तम तयारी केली आहे. आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games) कबड्डीचे विजेतेपद भारतच (India) पटकावेल, कारण भारतीय खेळाडू उत्कृष्ट आहेत. ते नक्कीच जिंकू शकतात असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Tags :

First published:

Tags: Pro kabaddi, Pro kabaddi league