Home /News /sport /

Pro Kabaddi League : भारताच्या कबड्डीपटूंचा पगार पाकिस्तानच्या बाबर आझमपेक्षा जास्त! ऐकून बसणार नाही विश्वास

Pro Kabaddi League : भारताच्या कबड्डीपटूंचा पगार पाकिस्तानच्या बाबर आझमपेक्षा जास्त! ऐकून बसणार नाही विश्वास

प्रो कबड्डी लीगच्या (Pro Kabaddi League) आठव्या मोसमाला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. कोरोना व्हायरसमुळे प्रो कबड्डी लीगचा मागचा मोसम झाला नव्हता, पण यंदा स्पर्धा 22 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

    मुंबई, 18 डिसेंबर : प्रो कबड्डी लीगच्या (Pro Kabaddi League) आठव्या मोसमाला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. कोरोना व्हायरसमुळे प्रो कबड्डी लीगचा मागचा मोसम झाला नव्हता, पण यंदा स्पर्धा 22 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. यंदा लीगमध्ये 12 टीम उतरल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच लीगचा लिलाव झाला होता. रेडर प्रदीप नरवाल Pardeep Narwal) याला यूपी योद्धाने 1.65 कोटी रुपयांना विकत घेतलं. लीगच्या इतिहासातला तो सगळ्यात महागडा खेळाडू ठरला. प्रदीपचा पगार पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) खेळणाऱ्या पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमपेक्षाही अधिक आहे. बाबर आझम (Babar Azam) पाकिस्तान सुपर लीगमध्ये (Pakistan Super League) कराची सुपर किंग्सकडून (Karachi Kings) खेळचो. मागच्या मोसमात टीमने त्याला प्लॅटिनम कॅटेगरी खेळाडूमध्ये ठेवलं होतं. पीएसएलमध्ये प्लॅटिनम कॅटेगरी खेळाडूंना 1.7 लाख डॉलर म्हणजेच 1.24 कोटी रुपये मिळतात. कराचीने या मोसमात बाबरला कर्णधार केलं. दोन खेळाडूंचा पगार बाबरपेक्षा जास्त प्रो कबड्डी लीगच्या या मोसमाचा लिलाव ऑगस्ट महिन्यात झाला होता. प्रदीप नरवालशिवाय तेलुगू टायटन्सने सिद्धार्थ देसाईला (Siddharth Desai) 1.30 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. म्हणजेच प्रदीप नरवाल आणि सिद्धार्थ देसाई यांचा पगार बाबरपेक्षा जास्त आहे. देशातल्या कबड्डीच्या लोकप्रियतेमुळेच हे शक्य झालं आहे. 2014 साली प्रो कबड्डी लीगला सुरुवात झाली, तेव्हा 8 टीम मैदानात उतरल्या होत्या. आता हीच संख्या 12 झाली आहे. स्पर्धेचे आतापर्यंत 7 मोसम झाले, यातला पहिला मोसम जयपूर पिंक पॅन्थर्सनी जिंकला. 2015 ला यू मुंबाचा विजय झाला. यानंतर पुढच्या तीन मोसमात पटना पायरेट्स चॅम्पियन झाले. पटना दोनपेक्षा जास्त टायटल जिंकणारी एकमेव टीम आहे. 2018 ला बैंगलुरू बूल्सने आणि 2019 साली बंगाल वॉरियर्सने ट्रॉफी पटकावली. आतापर्यंत 5 टीमनी प्रो कबड्डी लीगचा किताब जिंकला आहे, तर 7 टीमना अजूनही पहिल्या ट्रॉफीची अपेक्षा आहे. आयपीएल खेळाडूंना 16 कोटी आयपीएल 2022 (IPL 2022) साठी रिटेन खेळाडूंची यादी काही दिवसांपूर्वीच टीमनी जाहीर केली. तीन खेळाडूंना सर्वाधिक 16-16 कोटी रुपये मिळाले. यामध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant), मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि चेन्नई सुपर किंग्सच्या रवींद्र जडेजाचा (Ravindra Jadeja) समावेश आहे. जानेवारी महिन्यात होणाऱ्या मेगा ऑक्शनमध्ये खेळाडूंना यापेक्षा जास्त रक्कम मिळण्याची शक्यता आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Pro kabaddi, Pro kabaddi league

    पुढील बातम्या