Prithvi Shaw vs Sapna Gill Case: भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर सपना गिल यांच्यातील वादाची चांगलीच चर्चा झाली होती. सपनाने पृथ्वीवर विनयभंगाचे आरोप लावले होते. या प्रकरणी पोलिस एफआयआरही करण्यात आला होता आणि प्रकरण मॅजिस्ट्रेट कोर्टात पोहोचले. हे प्रकरण अजूनही सुरू आहे. मात्र या प्रकरणी पोलिसांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. त्यामुळे पृथ्वी शॉला मोठा दिलासा मिळाला आहे. पोलिसांनी सोमवारी (26 जून) मॅजिस्ट्रेट कोर्टाला सांगितले की, सपना गिलने पृथ्वी शॉवर केलेले सर्व आरोप खोटे आणि निराधार आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यानेही आपला रिपोर्ट न्यायालयात सादर केला आहे. सपनाने पृथ्वीवर मुंबईतील अंधेरी भागातील एका पबमध्ये विनयभंग केल्याचा आरोप केला होता. Robin Minz : धोनीच्या रांचीतून मुंबई इंडियन्सला सापडला नवा हिरा नेमकं प्रकरणं काय? हे संपूर्ण प्रकरण 15 फेब्रुवारीचं आहे. यावेळी पृथ्वी शॉ आपल्या मित्रांसोबत सांताक्रूझच्या एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये डिनरसाठी गेला होता. यावेळी पृथ्वी शॉसोबत दोन लोकांनी सेल्फी घेतला. पण नंतर तेच लोक परत आले आणि इतर लोकांसोबत सेल्फी घेण्यास सांगितलं. मात्र यावेळी पृथ्वी शॉने तो मित्रांसोबत जेवायला आला आहे आणि त्याला त्रास नकोय असे म्हणत नकार दिला. वाद विकोपाला जाऊन दोन्ही बाजूंमध्ये हाणामारी झाली. यानंतर पृथ्वी शॉच्या मित्राच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सपना गिलसह 8 जणांवर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी सपना गिललाही अटक करण्यात आली होती. त्यानंतर सपना जामिनावर बाहेर आली. धोनीचा जबरा फॅन! वाढदिवसाआधी माहीला स्वतःच्या रक्ताने लिहिलं पत्र सपनाने केले होते विनयभंगाचे आरोप त्यावेळी सपना गिल आणि पृथ्वी शॉमध्ये भांडणं झाल्याचे काही व्हिडिओ समोर आले होते. दोन्ही पक्षांनी एकमेकांवर मारहाणीचे आरोप लावले होते. सपनाने पृथ्वी शॉवर छेडछाडचे आरोपही लावले होते. तेव्हा सपनाने दावा केला होता की, पोलिसांनी तिचा FIR नोंदवला नाही. यानंतर ती थेट कोर्टात पोहोचली होती. कोर्टाने दखल घेतल्यानंतर पोलिसांनी प्रकरणं नोंदवले होते. सपना गिलने बॅटने मारहाण आणि विनयभंगासह काही प्रकरणांमध्ये आयपीसीच्या कलम 354, 509, 324 अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. सपनाने ही तक्रार नोंदवताना सरकारी रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्रही दिले आहे. ज्यामध्ये लैंगिक अत्याचाराचाही उल्लेख आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.