मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022: ऐन मोक्याच्या सामन्याआधी Delhi Capitals ला मोठा धक्का! महत्वाचा खेळाडू रुग्णालयात दाखल

IPL 2022: ऐन मोक्याच्या सामन्याआधी Delhi Capitals ला मोठा धक्का! महत्वाचा खेळाडू रुग्णालयात दाखल

युवा क्रिकेटर पृथ्वी शॉ याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्ली कॅपिटल्सला रविवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध सामना खेळायचा आहे आणि पृथ्वी शॉ रुग्णालयात आहे.

युवा क्रिकेटर पृथ्वी शॉ याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्ली कॅपिटल्सला रविवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध सामना खेळायचा आहे आणि पृथ्वी शॉ रुग्णालयात आहे.

युवा क्रिकेटर पृथ्वी शॉ याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्ली कॅपिटल्सला रविवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध सामना खेळायचा आहे आणि पृथ्वी शॉ रुग्णालयात आहे.

मुंबई, 8 मे : IPL 2022 मध्ये, आज चेन्नई सुपर किंग्ज (Chennai super kings) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi capitals) यांच्यात सामना होणार आहे. 15 व्या मोसमातील हा 55 वा सामना असेल. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. प्लेऑफच्या शर्यतीत सामील होण्यासाठी दिल्लीसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. सध्या दिल्लीचा संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. ऋषभ पंतच्या संघाने आजचा सामना जिंकला तर त्यांचा प्लेऑफचा मार्ग सुकर होईल. मात्र, ऐन मोक्याच्या क्षणी दिल्ली कॅपिटल्सचा एक महत्वाचा खेळाडू रग्णालयात भरती झाला आहे.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा (DC) भाग असलेल्या पृथ्वी शॉला ताप आला आहे. रविवारी पृथ्वी शॉने हॉस्पिटलमधील त्याचा फोटो शेअर केला. पृथ्वी शॉने तो तापातून बरा होत असल्याची माहिती दिली आहे. पृथ्वी शॉ शेवटचा सामना खेळू शकला नव्हता. आता रविवारी संघाचा चेन्नई सुपर किंग्जसोबत सामना आहे, तेव्हा पृथ्वी शॉला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

इंस्टाग्रामवर पृथ्वी शॉने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तो हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेला दिसत आहे. पृथ्वीने कॅप्शन लिहिले आहे की, तो तापातून बरा होत असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो लवकरच परत येईल, तुमच्या प्रार्थनेबद्दल सर्वांचे आभार.

संघात कोविडचा शिरकाव

रविवारीच दिल्ली कॅपिटल्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. पण त्याआधीच टीममध्ये कोरोनाचे प्रकरण समोर आले होते. दिल्ली कॅपिटल्सचा नेट बॉलर कोविड पॉझिटिव्ह आढळून आला, त्यानंतर त्याला आणि त्याच्या रूममेटला वेगळे करण्यात आले. दिल्ली कॅपिटल्समध्ये यापूर्वी सुमारे अर्धा डझन कोरोना प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचा समावेश होता. जरी आता सर्वजण त्यातून सावरले आहेत.

VIDEO: 12 सामने, 3 वेळा Golden Duck, आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीला झालंय तरी काय?

दिल्लीचं पुनरागमन

आयपीएल 2022 मध्ये दिल्लीची कामगिरी सरासरी राहिली आहे. आकडेवारीवर नजर टाकली तर दिल्ली कॅपिटल्समध्ये या सत्रात सातत्याचा अभाव होता. ऋषभ पंतच्या संघाने कधी एक सामना जिंकला तर कधी 2 पराभव स्वीकारले. पुन्हा एक जिंकला तर पुढच्या सामन्यात त्यांचा पराभव झाला. 15 व्या सत्रात दिल्ली कॅपिटल्सने 10 सामने खेळले ज्यात 5 जिंकले आणि 5 गमावले. 10 गुणांसह दिल्ली गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे.

First published:

Tags: Delhi capitals, Prithvi Shaw