जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / ऑस्ट्रेलियातून परतल्यावर सचिनचा पृथ्वीला तो सल्ला, करियरला मिळाली कलाटणी

ऑस्ट्रेलियातून परतल्यावर सचिनचा पृथ्वीला तो सल्ला, करियरला मिळाली कलाटणी

ऑस्ट्रेलियातून परतल्यावर सचिनचा पृथ्वीला तो सल्ला, करियरला मिळाली कलाटणी

टीम इंडियामधून झालेली हकालपट्टी पृथ्वी शॉच्या चांगलीच जिव्हारी लागली. यानंतर त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) खोऱ्याने रन काढले. पृथ्वीने फॉर्ममध्ये परतण्याचं हे श्रेय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) दिलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 मार्च : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात (India vs Australia) खराब कामगिरी केल्यामुळे पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याला भारतीय टीममधून डच्चू देण्यात आला. टीम इंडियामधून झालेली ही हकालपट्टी पृथ्वी शॉच्या चांगलीच जिव्हारी लागली. यानंतर त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) खोऱ्याने रन काढले. विजय हजारे ट्रॉफीच्या या मोसमात पृथ्वी शॉने आतापर्यंत 754 रन केले आहेत. एका मोसमातला हा सर्वाधिक स्कोअर आहे. पृथ्वीने फॉर्ममध्ये परतण्याचं हे श्रेय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) दिलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्याहून परतल्यानंतर मी सचिन तेंडुलकरला भेटलो. बॉलला शरिराजवळून खेळण्याचा सल्ला त्यांनी मला दिला, असं पृथ्वी शॉने सांगितलं. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना पृथ्वी शॉ म्हणाला, ‘ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर मी सचिनना भेटलो. यानंतर माझं नशीबच बदललं. फार काही बदल करू नकोस, फक्त बॉल शरिराजवळून खेळ, असं त्यांनी मला सांगितलं. मी बॉलपर्यंत पोहोचत होतो, यावर मी काम केलं. दुबईवरून मी थेट ऑस्ट्रेलियाला गेलो, त्यामुळे असं झालं असेल.’ ‘माझी मानसिक स्थिती नीट नव्हती. माझी बॅट गली एरियामधून खाली येत होती, पण मी आयुष्यभर याच पद्धतीने रन केल्या. मी जशा पद्धतीने आऊट होत होतो, ते पाहून मला लगेच गोष्टी ठीक करायच्या होत्या, ज्यात अडचण येत होती. मला बॅट शरिराजवळ ठेवायची होती, पण मला ते सुरूवातीला जमत नव्हतं,’ अशी कबुली शॉने दिली. ‘माझ्या यशात टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि बॅटिंग प्रशिक्षक विक्रम राठोड (Vikram Rathod) यांची भूमिकाही महत्त्वपूर्ण राहिली. नक्की कुठे चूक होत आहे, हे या दोघांनी मला सांगितलं. नेटमध्ये परतल्यानंतर मी यावर काम केलं. मी छोट्या चुका करत होतो. ऍडलेड टेस्टमध्ये मी दोन्ही इनिंगमध्ये मी खूप वाईट खेळलो,’ असं वक्तव्य शॉने केलं. पृथ्वी शॉने विजय हजारे ट्रॉफीमध्ये तीन शतकं आणि एक द्विशतक केलं आहे, त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये त्याला संधी मिळू शकते. आयपीएलमध्ये (IPL 2021) तो दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) कडून खेळतो. 9 एप्रिलपासून आयपीएल सुरू होत असल्यामुळे दिल्लीच्या टीमला त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात