मुंबई, 15 मार्च : भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याच्यावर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर सपना गिलने मंगळवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. गुन्हा रद्द करावा अशी मागणी तिने न्यायालयात केली. आपल्या विरोधात करण्यात आलेले आरोप खोटे असून या प्रकरणात गोवले जात असल्याचा दावा सपनाने केला आहे. अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने सपनासह चौघांना या प्रकरणी जामीन दिला होता. सपना गिलने असा आरोप केला की, पृथ्वी शॉची मोठ्या लोकांसोबत ओळख असून तिच्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. मला खोट्या आरोपांवरून गुन्ह्यात गोवण्यात आलं आहे. पृथ्वी शॉच्या मित्रांच्या वैयक्तिक बदल्यासाठी आणि त्रास देण्याच्या हेतूने कायद्याचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात असल्याचंही सपनाने म्हटलं आहे. पुण्यात सापडला पाकिस्तानी तरुण, 8 वर्षांपासून या भागात होता मुक्कामी, अखेर पोलिसांनी पकडले याचिकेत सपना गिलने विनंती केलीय की, पोलिसांनी तिच्याविरोधातील गुन्हा रद्द करावा. ओशिवारा पोलिस स्टेशनचे तपास अधिकारी आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्याविरोधातही कारवाई करावी अशी मागणी तिने याचिकेत केलीय. सपना गिल आणि इतरांवर फेब्रुवारी महिन्यात शिवीगाळ आणि हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सपना आणि तिच्या मित्रांनी हल्ल्यानंतर खोटी तक्रार देण्यासह धमकी दिली. तसंच तक्रार मागे घेण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणीही करण्यात आली. या प्रकरणी सपना गिलला १७ फेब्रुवारीला अटकही करण्यात आली होती. तिला २० फेब्रुवारी रोजी जामीन मिळाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.