मुंबई, 18 डिसेंबर : फिफा वर्ल्ड कपमध्ये अखेरपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सला पराभूत केलं. यासह मेस्सीचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले. अर्जेंटिनाने तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतिम सामन्यानंतर अर्जेंटिनाचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्जेंटिनाचे अभिनंदन करणारे ट्विट केलेय. अंतिम सामन्यात शेवटच्या क्षणापर्यंत थरारक अशी लढत बघायला मिळाली. सुरुवातीला अर्जेंटिनाची सामन्यावर पकड होती. पण अखेरच्या क्षणी अर्जेंटिनाने आक्रमक खेळ करत सामन्यात पुनरागमन केलं. या सामन्याचा आनंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लुटला.
This will be remembered as one of the most thrilling Football matches! Congrats to Argentina on becoming #FIFAWorldCup Champions! They’ve played brilliantly through the tournament. Millions of Indian fans of Argentina and Messi rejoice in the magnificent victory! @alferdez
— Narendra Modi (@narendramodi) December 18, 2022
हेही वाचा : मेस्सी 2022 चा वर्ल्ड कप जिंकेल; तारखेसह केलेली भविष्यवाणी ठरली खरी मोदींनी म्हटलं की, सर्वात थरारक फुटबॉल सामना म्हणून हा लक्षात राहिल. फिफा वर्ल्ड कप २०२२ चे चॅम्पियन झाल्याबद्दल अर्जेंटिनाच्या संघाचे अभिनंदन. स्पर्धेत त्यांनी शानदार असा खेळ केला. वर्ल्ड कप जिंकल्याने अर्जेंटिना आणि मेस्सीच्या लाखो भारतीय चाहत्यांना आनंद झालाय.
हेही वाचा : FIFA : वर्ल्ड कप जिंकले तरी विजेत्यांना खरी ट्रॉफी देत नाहीत, कारण… अंतिम सामन्यात ८० व्या मिनिटापर्यंत अर्जेंटिनाने २-० अशी आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर दोन मिनिटात किलियन एम्बाप्पेने सलग दोन करत सामन्याची रंगत वाढवली. दोन गोल झाल्यानंतर फ्रान्सच्या खेळा़डुंनी आक्रमक खेळ केला. निर्धारीत वेळेत सामना बरोबरीत राहिल्यानंतर अतिरिक्त वेळेत खेळण्यात आला. त्यात १०८ व्या मिनिटाला अर्जेंटिनाने गोल करून आघाडी घेतली. पण पुन्हा त्यानंतर एम्बाप्पेने एक गोल करत पुन्हा सामना बरोबरीत आणला. यामुळे शेवटी पेनल्टी शूटआऊटमध्ये सामन्याचा निकाल लागला. यात फ्रान्सच्या दोघांना गोल करता आला नाही आणि ४-२ ने अर्जेंटिनाने बाजी मारली.