जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / मजुराच्या मुलाची ऑलिम्पिकमध्ये धडक, मराठमोळ्या प्रवीणच्या संघर्षाला पंतप्रधानांचा सलाम

मजुराच्या मुलाची ऑलिम्पिकमध्ये धडक, मराठमोळ्या प्रवीणच्या संघर्षाला पंतप्रधानांचा सलाम

मजुराच्या मुलाची ऑलिम्पिकमध्ये धडक, मराठमोळ्या प्रवीणच्या संघर्षाला पंतप्रधानांचा सलाम

टोक्यो ऑलिम्पिकसाठी (Tokyo Olympics 2021) पात्र झालेला मराठमोळा तिरंदाज प्रवीण जाधव (Archer, Pravin Jadhav) याच्या संघर्षाची पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दखल घेतली आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 27 जून: टोक्यो ऑलिम्पिकसाठी (Tokyo Olympics 2021) पात्र झालेला मराठमोळा तिरंदाज प्रवीण जाधव (Archer Pravin Jadhav) याच्या संघर्षाची पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दखल घेतली आहे. ‘मन की बात’ (PM Narendra Modi, Man Ki Baat) या देशाला उद्देशून केलेल्या कार्यक्रमात त्यांनी या संघर्षाचा उल्लेख केला. प्रवीण सातारा जिल्ह्यातील एका गावात राहतो. तो एक महान तिरंदाज आहे. त्याचे आई-वडील मजुरी करुन कुटुंब चालवतात. त्यांचा मुलगा आता टोक्यो ऑलिम्पिकला जात आहे. ही फक्त त्याच्या आई-वडिलांसाठी नाही तर आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे," या शब्दात पंतप्रधान मोदींनी त्याचा गौरव केला आहे.

जाहिरात

कोण आहे प्रवीण जाधव? टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पात्र होण्याचा प्रवीणचा प्रवास सहज झालेला नाही. प्रवीण सातारा जिल्ह्यातील फलटण या गावचा तिरंदाज आहे. भारतीय लष्करात (Indian Army) हवालदार असलेल्या प्रवीणने ऑलिम्पिकमध्ये पात्र होण्यासाठी 30 महिने कठोर मेहनत घेतली. या काळात तो गावी एकदाही गेला नाही. तो 2018 साली झालेल्या दिवाळीत गावी गेला होता. त्यानंतर 30 महिन्यांनी यावर्षी मार्च महिन्यात ऑलिम्पिकसाठी पात्र झाल्यावरच गावी परतला. तिरंदाज म्हणून ऑलिम्पिकमध्ये पात्र होण्यासाठी खेळाडूची निवड ही वैयक्तिक कामगिरीवर होत नाही. तर देशासाठी असलेल्या कोट्यातून होते. त्यामुळे प्रवीणपुढील आव्हान आणखी खडतर होते. त्याने पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये (ASI) तिरंदाजीची कठोर साधना केली. पंतप्रधान मोदींची आजची ‘मन की बात’ खूप महत्त्वाची, जाणून घ्या कारण कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे पात्रता स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतरही प्रवीणनं गावी न जाता तिरंदाजीवर फोकस केला. त्याच्या या मेहनतीचं अखेर चीज झाले. तो भारताचा पहिल्या क्रमांकाचा तिरंदाज म्हणून स्पर्धेसाठी पात्र झाला. प्रवीणकडून आता टोक्यो ऑलिम्पिकमध्ये देशाला पदकाची अपेक्षा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात