Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

PKL : Mumbai vs Pune वॉर! मॅचआधी यू मुंबाने सांगितलं मुंबई पुण्यापेक्षा का भारी!

PKL : Mumbai vs Pune वॉर! मॅचआधी यू मुंबाने सांगितलं मुंबई पुण्यापेक्षा का भारी!

Photo-PKL

Photo-PKL

प्रो कबड्डी लीगमध्ये (Pro Kabaddi League) आज यू मुंबाचा सामना पुणेरी पलटणशी (U Mumba vs Puneri Paltan) होणार आहे. या सामन्याआधीच यू मुंबाने 3 फोटो शेयर करत मुंबई पुण्यापेक्षा का भारी आहे, हे दाखवून दिलं आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 13 जानेवारी : प्रो कबड्डी लीगमध्ये (Pro Kabaddi League) आज यू मुंबाचा सामना पुणेरी पलटणशी (U Mumba vs Puneri Paltan) होणार आहे. या सामन्याआधीच यू मुंबाने 3 फोटो शेयर करत मुंबई पुण्यापेक्षा का भारी आहे, हे दाखवून दिलं आहे. यू मुंबाने प्रो कबड्डी लीग जिंकल्याचा, रोहित शर्माचा (Rohit Sharma) आयपीएल ट्रॉफी (IPL) घेऊन आणि आयएसएल (ISL) या फूटबॉल लीगमधला मुंबई सिटी फूटबॉल क्लबचा (Mumbai City FC) ट्रॉफी जिंकलेला फोटो त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेयर केला आहे.

प्रो कबड्डी लीगच्या दुसऱ्या मोसमात 2015 साली यू मुंबाचा विजय झाला होता. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने सर्वाधिक 5 वेळा ट्रॉफी जिंकली आहे. तर 2020 सालची आयएसएल मुंबई सिटी फूटबॉल क्लबने जिंकली होती. पुण्याच्या टीमला प्रो कबड्डी लीगमध्ये अजून एकदाही विजय मिळवता आलेला नाही. तसंच आयपीएलमध्येही पुण्याची टीम काही मोसम खेळली होती, तिकडेही त्यांच्या पदरी निराशा आली. यू मुंबाने मुंबईला तिन्ही ट्रॉफी जिंकता आल्याचं सांगत पुण्याच्या दुखऱ्या जागेवर बोट ठेवलं आहे.

प्रो कबड्डी लीगच्या यंदाच्या मोसमात यू मुंबा पाचव्या तर पुणेरी पलटण 11 व्या क्रमांकावर आहे. मुंबईने 8 पैकी 3 सामने जिंकले असून 2 सामन्यात त्यांचा पराभव झाला तर 3 मॅच ड्रॉ झाला. मुंबईच्या खात्यात सध्या 25 पॉईंट्स आहेत. तर पुणेरी पलटणने 8 पैकी 3 मॅच जिंकल्या आणि 5 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला. पुणेरी पलटणच्या खात्यात 16 पॉईंट्स आहेत.

प्रो कबड्डी लीगच्या इतिहासात या दोन्ही टीममध्ये 14 मॅच झाल्या, यातल्या 9 मॅच यू मुंबाने जिंकल्या, तर 5 मॅचमध्ये पुण्याला विजय मिळाला. या दोन्ही टीममधल्या दोन मॅच टाय झाल्या. त्यामुळे आकडेवारी बघितली तर यू मुंबा पुणेरी पलटणवर भारी दिसत आहे. यू मुंबा आणि पुणेरी पलटण यांच्यातला सामना रात्री 8.30 वाजता सुरू होणार आहे.

First published:

Tags: Pro kabaddi, Pro kabaddi league