तीनवेळा पीकेएल जिंकणाऱ्या पटणाने सेमी फायनलमध्ये तगड्या यूपी योद्धाचा पराभव केला होता. तर सिझन 7 ची उपविजेता असलेल्या दिल्लीनं बेंगलुरू बुल्सचा पराभव करत सलग दुसऱ्या सिझनमध्ये फायनल गाठली होती. पाटणाचा लीग स्टेजच्या दोन्ही मॅचमध्ये दिल्लीने पराभव केला होता, पहिल्या मॅचमध्ये ऑल राऊंडर संदीप नरवालनं जबरदस्त खेळ केला होता. तर दुसऱ्या मॅचमध्ये मंजीत छिल्लरनं हाई 5 करत दिल्लीला विजय मिळवून दिला. या दोन पराभवांचा बदला पटणा घेईल, असं वाटत होतं, पण एका पॉईंटने त्यांना पराभव स्वीकारावा लागला.And we have our first time C.H.A.M.P.I.O.N.S. of #VIVOProKabaddi - ! #PATvDEL #SuperhitPanga #VIVOProKabaddi @DabangDelhiKC @PatnaPirates pic.twitter.com/H9C3sd96Te
— ProKabaddi (@ProKabaddi) February 25, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pro kabaddi, Pro kabaddi league