मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /PKL Eliminator : पुण्याचं स्वप्न भंगलं, 1.60 कोटींच्या प्रदीप नरवालने दिला धक्का

PKL Eliminator : पुण्याचं स्वप्न भंगलं, 1.60 कोटींच्या प्रदीप नरवालने दिला धक्का

Photo-PKL Twitter

Photo-PKL Twitter

प्रो कबड्डी लीग एलिमिनेटरच्या (PKL Eliminator) पहिल्याच सामन्यात यूपी योद्धाने पुणेरी पलटणचा (UP Yoddha vs Puneri Paltan) 42-31 ने पराभव केला आहे. या पराभवासोबतच पुणेरी पलटणचं प्रो कबड्डी लीगची ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे.

मुंबई, 21 फेब्रुवारी : प्रो कबड्डी लीग एलिमिनेटरच्या (PKL Eliminator) पहिल्याच सामन्यात यूपी योद्धाने पुणेरी पलटणचा (UP Yoddha vs Puneri Paltan) 42-31 ने पराभव केला आहे. या पराभवासोबतच पुणेरी पलटणचं प्रो कबड्डी लीगची ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. प्रो कबड्डी लीगच्या इतिहासातील सगळ्यात महागडा खेळाडू असलेल्या प्रदीप नरवालच्या (Pradeep Narwal) सुपर-10 मुळे यूपी योद्धाने पुणेरी पलटणवर दणदणीत विजय मिळवला.

यूपी योद्धाचे 41 पैकी 18 पॉईंट्स एकट्या प्रदीप नरवालने केले, यातले 17 रेड आणि 1 बोनस पॉईंट होता, याशिवाय सुरेंद्र गिल आणि सुमित यांनी प्रत्येकी 5-5 तर नितेश कुमारने 3 पॉईंट्स स्कोअर केले. आशू सिंग, गुरूदीप आणि श्रीकांत जाधव यांना 1-1 पॉईंट करता आला.

पुण्याकडून अस्लम इनामदारने सर्वाधिक 10 पॉईंट्स केले. आकाश शिंदेला 7, मोहित गोयातला 4, सोम्बिरला 3 तर हादी ताजीकला 2 पॉईंट्स करता आले. अभिनेष नदराजन, विशाल भारद्वाज आणि शुभम शेळके यांनीही 1-1 पॉईंट केला, पण त्यांना यूपी योद्धाच्या पुढे जाता आलं नाही.

प्रो कबड्डी लीगच्या लिलावात प्रदीप नरवाल याच्यावर यूपी योद्धानी तब्बल 1.60 कोटी रुपयांची बोली लावली होती. पीकेएलच्या इतिहासातली ही विक्रमी बोली होती. आपल्याला मिळालेली ही रक्कम योग्य असल्याचं प्रदीपने एलिमिनेटरच्या या सामन्यात दाखवून दिलं. प्रदीप नरवालच्या या पंचमुळे पुणेरी पलटणचं पीकेएलच्या या मोसमातलं आव्हान संपुष्टात आलं आहे. याचसह यूपी योद्धा पीकेएलच्या या मोसमातली तिसरी सेमी फायनलला पोहोचणारी टीम ठरली आहे.

First published:

Tags: Pro kabaddi, Pro kabaddi league