मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /पाकिस्तानच्या क्रिकेट संघातील 3 खेळाडू Corona Positive,क्रिकेट बोर्डाने दिली माहिती

पाकिस्तानच्या क्रिकेट संघातील 3 खेळाडू Corona Positive,क्रिकेट बोर्डाने दिली माहिती

pakistan cricket board

pakistan cricket board

पाकिस्तान महिला क्रिकट (Pakistan Women Cricketer) संघातून वाईट बातमी समोर आली आहे. 3 महिला क्रिकेटर्सना कोरोनाची बाधा (Corona Positive) झाल्याचं समोर आलं आहे.

दुबई, 28 ऑक्टोबर: पाकिस्तान महिला क्रिकट (Pakistan Women Cricketer) संघातून वाईट बातमी समोर आली आहे. 3 महिला क्रिकेटर्सना कोरोनाची बाधा (Corona Positive) झाल्याचं समोर आलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) गुरुवारी (28 ऑक्टोबर) याबाबतची माहिती दिली आहे.

पाकिस्तान महिला टीम वेस्टइंडीज संघाविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. यासाठीच कराचीच्या हनीफ मोहम्मद हाय परफॉर्मेंस सेंटरमध्ये संघाचा सराव कॅम्प लागला होता. यावेळीच बुधवारी कोरोना चाचणी करण्यात आली ज्यामध्ये 3 खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली.

पाकिस्तानच्या क्रिकेटने बाधित खेळाडूंची नावे जाहिर केलेली नाहीत. पण या तिघीचंही संपूर्ण विलगीकरण झाल्याचं समोर आलं आहे. तसचं सध्यातरी त्यांना 2 नोव्हेंबरपर्यंत विलगीकरणात ठेवण्यात आलं असून त्यांनी वेळोवेळी कोरोना चाचणी केली जाणार आहे.

वेस्ट इंडिजचा महिला संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर येणार आहे. यावेळी पाकिस्तान आणि वेस्ट इंडीजच्या महिला संघामध्ये 3 वनडे सामन्यांची मालिका सुरु होणार होती. यातील पहिला सामना 8 नोव्हेंबर रोजी, तर दुसरा 11 नोव्हेंबर आणि शेवटचा 14 नोव्हेंबर रोजी पार पडणार होता.

याच वर्षी पाकिस्तानचा महिला संघ वेस्ट इंडीजच्या दौऱ्यामध्ये तीन टी20 आणि 5 वनडे सामने खेळला होता. त्याचदरम्यान वेस्टइंडीज क्रिकेटच्या सीईओंनी वेस्ट इंडिजही पाकचा दौरा करणार असल्याचे स्पष्ट केले होते.

First published:

Tags: Coronavirus, Covid-19, Covid-19 positive, Cricket news, Pakisatan, Pakistan Cricket Board