कराची, 04 फेब्रुवारी : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीन शाहने कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या वेगामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आशिया कपमध्ये भारतीय गोलंदाजांसमोर त्याने चमकदार कामगिरी केली होती. भारताविरुद्ध टी२० मध्ये पदार्पण करताना त्याने जबरदस्त गोलंदाजी केली होती. त्याच्या या कामगिरीनंतर कौतुकाचा वर्षावही झाला. दरम्यान, नसीम शाहला आता पाकिस्तान सरकारने मोठं बक्षीस दिलं आहे.
शाहीन आफ्रिदीच्या अनुपस्थितीत भारताविरुद्ध आशिया कपमध्ये पदार्पण करणाऱ्या नसीम शाहने कमी वयात मोठी झेप घेतलीय. पाकिस्तान क्रिकेट संघात चांगली कामगिरी करणाऱ्या युवा गोलंदाजाला वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी डीएसपी करण्यात आलं आहे. त्याला बलूचिस्तानचा डीएसपी करण्यात आलं असून जेव्हा तो क्रिकेटच्या मैदानात नसेल तेव्हा ही जबाबदारी तो सांभाळेल. पाकिस्तानी मीडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.
DSP Naseem Shah ❤️🙈 pic.twitter.com/2Ir5jdGySz
— Ejaz Wasim Bakhri (@ejazwasim) February 4, 2023
हेही वाचा : BBL : पर्थ स्कॉचर्स पाचव्यांदा विजेते, फायनलमध्ये ब्रिस्बेन हिटला दिला पराभवाचा दणका
वयाच्या १६ व्या वर्षी नसीम शाहने बांगलादेशविरुद्ध खेळताना हॅट्ट्रिक घेत विश्वविक्रम केला होता. त्याने रावळपिंडी कसोटीत २०२० मध्ये ही ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्यानंतर २०२२ मध्ये आशिया कप स्पर्धेत भारताविरुद्ध टी२० पदार्पणात त्याने केएल राहुल आणि सूर्यकुमार यादवची विकेट घेतली होती. पायाच्या दुखापतीमुळे त्याला अखेरचं षटक टाकता आलं नव्हतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.