सिडनी, 04 फेब्रुवारी : बीग बॅश लीगमध्ये पर्थ स्कॉचर्सने पाचव्यांदा विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम सामन्यात पर्थ स्कॉचर्सने ब्रिस्बेन हिटला ५ विकेटने पराभूत केलं. ब्रिस्बेनने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद १७५ धावा केल्या होत्या. यानंतर प्रत्युत्तरादाखल खेळताना पर्थ स्कॉचर्सने एश्टन टर्नरच्या खेळीच्या जोरावर तीन चेंडू आणि ५ गडी राखून विजय मिळवला.
ब्रिस्बेन हिटने दिलेल्या १७६ धावांचा पाठलाग करताना पर्थ स्कॉचर्सच्या बॅनक्राफ्ट आणि स्टिफन यांनी चांगली सुरुवात केली. स्टीफनने १९ चेंडूत २१ धावा केल्या. त्याने बॅनक्राफ्टसोबत ३२ धावांची भागिदारी केली. बॅनक्राफ्ट १५ धावा करून बाद झाला. त्यानतंर एरोन हार्डी १७ धावांवर तंबूत परतला. तर यष्टीरक्षक जोशने २२ चेंडूत २६ धावा केल्या.
हेही वाचा : अख्खं नागपूर बोलतंय, शुभमन आतातरी बघ! पोस्टर गर्लवरून उमेश यादवचं ट्विट
पर्थ स्कॉचर्सची अवस्था बिकट असताना एश्टन टर्नरने अर्धशतकी खेळी केली तर कूपरने वेगवान २५ धावा केल्यानं अखेरच्या षटकात ३ चेंडू राखून पर्थ स्कॉचर्सने विजय मिळवला. एश्टन टर्नरने ३२ चेंडूत ५३ धावा केल्या तर कूपर कोनोलीने ११ चेंडूत २५ धावा केल्या.
बीग बॅश लीगमध्ये पर्थ स्कॉचर्सने पाचव्यांचा विजेतेपदावर नाव कोरलं. तर याआधी सिडनी सिक्सर्सने तीन वेळा तर ब्रिस्बेन हिट, सिडनी थंडर्स, एडलेड स्ट्रायकर्स, मेलबर्न रेनेगेड्स यांनी प्रत्येकी एक वेळा विजेतेपद पटकावलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket