नवी दिल्ली, 20 सप्टेंबर: पाकिस्तानला आणखी एक मोठा झटका आज बसला. न्यूझीलंडने या देशात **(New Zealand not playing in Pakistan)**खेळायला नकार दिल्यानंतर आता इंग्लंडनेही (England Calls off Pak cricket tour)याच देशाची री ओढली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानात खेळणार नसल्याचं इंग्लंडने जाहीर केलं आहे.
इंग्लंडच्या या निर्णयाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडने पाकिस्तान दौरा रद्द केल्यानंतर पाकिस्तानची आधीच नाचक्की झाली होती. त्यात आता इंग्लंडच्या निर्णयाने भर पडली आहे. पुढच्या महिन्यात इंग्लंडची टीम पाकिस्तानात येणार होती. महिला टीमचाही पाकिस्तान दौरा आयोजिक होता. आता महिला आणि पुरुष दोन्ही इंग्लंडच्या टीम पाकिस्तानात खेळणार नाहीत. इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाने (ECB) सुरक्षेच्या कारणास्तव असं थेटपणे म्हटलेलं नसलं तरी हेच दौरा रद्द करण्यामागचं खरं कारण आहे हे जगजाहीर आहे.
"We can confirm that the Board has reluctantly decided to withdraw both teams from the October trip."
— England Cricket (@englandcricket) September 20, 2021
🇵🇰 #PAKvENG 🏴
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने असं म्हटलंय की ऑक्टोबरमधला आमचा दौरा आम्ही रद्द केला आहे. आमच्या दोन्ही टीम्स हा दौरा करणार नाही. PAKVsENG असा हॅशटॅग वापरत त्यांनी पाकिस्तान देशाचं नावही थेटपणे घेतलेलं नाही. कुठलंही कारण अधिकृतपणे देण्यात आलेलं नाही. खेदपूर्वक निर्णय असल्याचा उल्लेख आहे.
PAK vs NZ : इम्रान खान हात-पाय पडले, तरी न्यूझीलंडच्या पंतप्रधान ऐकल्या नाहीत!न्यूझीलंड क्रिकेट टीमने पहिल्या वनडेच्या काही मिनिटं आधी आपण पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेत (New Zealand Called off Pakistan Tour) असल्याचं सांगितलं. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅकिंडा आरडेर्न यांच्याशीही चर्चा केली, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. न्यूझीलंडची टीम पाकिस्तान दौऱ्यात रावळपिंडीमध्ये 3 वनडे आणि लाहोरमध्ये 5 टी-20 मॅचची सीरिज खेळणार होती, पण आता हा दौराच रद्द करण्यात आला आहे. न्यूझीलंडविरुद्धची सीरिज वाचवण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रयत्न केले. आता न्यूझीलंडपाठोपाठ इंग्लंडनेही दौरा रद्द केल्याने PCB ची मोठी नाचक्की झाली आहे. क्राईस्टचर्च गोळीबार विसरलात का? न्यूझीलंड सीरिज रद्द झाल्यावर पाकिस्तानचा संताप पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी हा धक्का असेल, पण खेळाडूंची सुरक्षा सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. आमच्यासाठी हा एकमेव पर्याय होता, अशी प्रतिक्रिया न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड व्हाईट यांनी दिली होती. आता इंग्लंडने कुठलंही अधिकृत कारण न देताच पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली आहे.