सिडनी, 4 जानेवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात भारताच्या चेतेश्वर पुजाराने दमदार कामगिरी करत 193 धावा फटकावल्या. पुजाराच्या या कामगिरीवर पाकिस्तानचे माजी क्रिकेटर रमीझ राजा हे फलतेच खूष झाले आहेत. राजा यांनी पुजारासह भारतीय संघाचं तोंडभरून कौतुक केलं आहे. त्याचवेळी पाकिस्तानच्या टीमवरही नाराजी व्यक्त केली आहे.
सिडनी कसोटी सामन्याच्या पहिल्या सत्रात पुजाराने 193 धावा केल्या. तो अवघ्या सात धावांनी द्विशतकाला मुकला. करिअरमध्ये पहिल्यांदा तो द्विशतकी खेळी खेळणार होता. पुजाराने द्विशतकी खेळी खेळली नसली तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत सर्वात जास्त चेंडू खेळण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर झाला आहे. पुजाराने द्रविडच्या 1203 चेंडू खेळण्याच्या रेकॉर्डला मागे टाकले आहे.
जागतिक रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलियात सर्वात जास्त चेंडू खेळण्याचा रेकॉर्ड एलिस्टर कुकच्या नावावर आहे. पुजाराने डेसमेंड हेंसला याबाबतीत मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे. पुजारा आतापर्यंत मैदानात 1868 मिनिटं टिकून राहिला आहे. सर्व परदेश दौऱ्याबद्दल बोलायचे झाले तर आजही सुनील गावस्कर यांच्यानाववरच हा रेकॉर्ड आहे. 1971 मध्ये गावस्कर यांनी विंडीजविरोधात 1978 मिनिटं फलंदाजी केली होती.
VIDEO : ऑस्ट्रेलियात इतिहास घडवण्याआधी विराट आणि टीम इंडियाचा हटके अंदाज
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.