मुल्तान, 09 डिसेंबर : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज मुल्तान क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जात आहे. पहिल्या सामन्यात धावांचा डोंगर उभा करणाऱ्या इंग्लंडचा दुसऱ्या सामन्यात मात्र डाव गडगडला. रावळपिंडीत गोलंदाजांची धुलाई झाली तर मुल्तानमध्ये खेळपट्टी गोलंदाजांना पोषक अशी आहे.
इंग्लंडचा दुसऱ्या सामन्यात पहिला डाव २८१ धावात संपुष्टात आला. यात पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या अबरार अहमदने तब्बल ७ गडी बाद केले. तर जाहिद महमूदने ४८ व्या षटकात सलग दोन गडी बाद करत अबरार अहमदचं एका डावात दहा गडी बाद करण्याचं स्वप्न तोडलं. यानंतर ५२ व्या षटकात जाहिदने ५२ व्या षटकात अँडरसनला बोल्ड केलं.
हेही वाचा : FIFA 2022: सेमीफायलमध्ये पोहोचण्यासाठी 8 संघ भिडणार, आज दोन सामने; कोण मारणार बाजी?
रावळपिंडी कसोटीत १०१ षटकात ६५७ धावा करणाऱ्या इंग्लंडच्या संघाला दुसऱ्या कसोटी सामन्यात ५१.४ षटकात फक्त २८१ धावा करता आल्या. पाकिस्तानचा फिरकीपटू अबरार अहमदच्या फिरकीच्या जाळ्यात इंग्लंडचे खेळाडू अडकले. इंग्लंडकडून बेन डकेटने सर्वाधिक ६३ धावा केल्या. त्याशिवाय ओली पोपने ६० धावा केल्या. दोघांनी अर्धशथकी भागिदारी केली. या दोघांनाही अबरार अहमदने बाद केलं. जॅक क्रॉलीने ३७ चेंडूत १९ धावा केल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.