मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /रॉजर फेडररनं 'या' कारणामुळे घेतली फ्रेंच ओपनमधून माघार

रॉजर फेडररनं 'या' कारणामुळे घेतली फ्रेंच ओपनमधून माघार

माजी वर्ल्ड नंबर 1 आणि 20 ग्रँड स्लॅम स्पर्धा विजेत्या रॉजर फेडररनं (Roger Federer) फ्रेंच ओपन स्पर्धेतून माघार घेतली आहे. फेडररनं या स्पर्धेच्या चौथ्या फेरीत प्रवेश केल्यानंतर माघार घेत असल्याचे जाहीर केले.

पॅरीस, 7 जून : माजी वर्ल्ड नंबर 1 आणि 20 ग्रँड स्लॅम स्पर्धा विजेत्या रॉजर फेडररनं (Roger Federer) फ्रेंच ओपन स्पर्धेतून माघार घेतली आहे. (Roger Federer pulls out of French Open 2021) फेडररनं या स्पर्धेच्या चौथ्या फेरीत प्रवेश केल्यानंतर माघार घेत असल्याचे जाहीर केले. 39 वर्षांच्या फेडररनं तिसऱ्या फेरीत जर्मनीच्या डोमॅनिक कोपफर (Dominik Koepfer) याचा 7-6 (7/5), 6-7 (3/7), 7-6 (7/4), 7-5  असा पराभव केला. फेडररला हा विजय मिळवण्यासाठी 3 तास 39 मिनिटे घाम गाळावा लागला. त्यानंतर फेडररनं या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला.

"मी माझ्या टीमशी चर्चा केल्यानंतर या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. गुडघ्याच्या दुखापतीवरील दोन ऑपरेशननंतर शरिराला आराम देणे आवश्यक आहे. मला माझ्या शरिराच्या गरजांचा विचार केला पाहिजे. तसेच दुखापतीमधून बरं होताना कोणताही घाई परवडणारी नाही." असे फेडररने यावेळी सांगितले.

"मी या स्पर्धेच्या तीन मॅच खेळू शकलो याचा समाधान आहे. टेनिस कोर्टावर परत येण्यापेक्षा कोणतीही गोष्ट अधिक आनंदाची कोणतीही गोष्ट नाही," असे फेडररने यावेळी स्पष्ट केले.

विम्बलडन मुख्य लक्ष्य

रॉजर फेडररनं गुडघ्याच्या दुखापतीमुळे 2020 पासून फक्त तीन स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. 28 जूनपासून सुरु होणारी विम्बलडन (Wimbledon) स्पर्धा हे आपलं मुख्य लक्ष्य असल्याचे फेडररने यापूर्वीच जाहीर केले. फेडररने विम्बलडन स्पर्धेचे आठ वेळा विजेतेपद पटकावले असून तो यंदा नवव्यांदा विजेतेपद पटकावण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे.

चांगल्या कामगिरीनंतरही इंग्लंडचा बॉलर निलंबित, 8 वर्षांपूर्वीच्या चुकीचा फटका

रॉजर फेडररनं कोणत्याही ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या चौथ्या फेरित प्रवेश करण्याचाी ही 68 वी वेळ होती. हा एक रेकॉर्ड आहे. सर्बियाचा नोवाक जोकोविज (54) दुसऱ्या क्रमांकावर असून स्पेनचा राफेल नदाल (50) तिसऱ्या क्रमांकावर आहे.

First published:

Tags: Tennis player, Wimbledon