मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /On This Day : जेव्हा विनोद कांबळीने रडत-रडत मैदान सोडलं होतं...

On This Day : जेव्हा विनोद कांबळीने रडत-रडत मैदान सोडलं होतं...

भारतीय क्रिकेटच्या (Team India) इतिहासात 13 मार्च 1996 हा एक काळा दिवस आहे. या दिवशी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या वर्ल्ड कप सेमी फायनलच्या (India vs Sri Lanka 1996 World Cup Semi Final) आठवणी भारतीय फॅन्सना आजही छळतात.

भारतीय क्रिकेटच्या (Team India) इतिहासात 13 मार्च 1996 हा एक काळा दिवस आहे. या दिवशी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या वर्ल्ड कप सेमी फायनलच्या (India vs Sri Lanka 1996 World Cup Semi Final) आठवणी भारतीय फॅन्सना आजही छळतात.

भारतीय क्रिकेटच्या (Team India) इतिहासात 13 मार्च 1996 हा एक काळा दिवस आहे. या दिवशी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या वर्ल्ड कप सेमी फायनलच्या (India vs Sri Lanka 1996 World Cup Semi Final) आठवणी भारतीय फॅन्सना आजही छळतात.

मुंबई, 13 मार्च : भारतीय क्रिकेटच्या (Team India) इतिहासात 13 मार्च 1996 हा एक काळा दिवस आहे. या दिवशी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या वर्ल्ड कप सेमी फायनलच्या (India vs Sri Lanka 1996 World Cup Semi Final) आठवणी भारतीय फॅन्सना आजही छळतात. कोलकात्यामधील इडन गार्डनवर झालेल्या त्या मॅचमध्ये भारताची बॅटींग ऑर्डर अचानक गडगडली. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रेक्षकांनी हुल्डबाजी करत खेळ थांबवला. मॅच रद्द करावी लागल्याने  विनोद कांबळीने (Vinod Kambli) रडत-रडत मैदान सोडले. या सर्व आठवणी आजही भारतीय फॅन्सना त्रास देतात.

भारताची दमदार सुरुवात

त्रासदायक ठरलेल्या त्या मॅचमध्ये भारताची सुरुवात दमदार झाली होती. संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेल्या आक्रमक सुरुवात करुन देणारे सनथ जयसुर्या आणि रोमेश कालुवितरणा हे ओपनर्स झटपट आऊट झाले. त्यांना जवागल श्रीनाथने आऊट केले होते. श्रीलंकेची तिसरी विकेटही थोड्याच अंतराने पडली. त्यामुळे भारतीय टीमने मॅचवरील पकड आणखी घट्ट केली होती.

श्रीलंकेच्या इनिंगला सावरण्याचे काम अनुभवी अरविंद डिसल्वाने केले. डिसल्वाने अनुभवी रोशन महानामा सोबत 50 रनची महत्त्वाची पार्टरनशिप केली. डिसल्वा 47 बॉलमध्ये 66 रन काढून आऊट झाला, पण त्याने श्रीलंकेला मॅचमध्ये परत आणले होते.

डिसल्वा आऊट झाल्यानंतर रोशन महानामाने अन्य बॅट्समनसोबत प्रतिकार सुरु ठेवला. महानामाचे अर्धशतक आणि त्याला अन्य खेळाडूंनी दिलेली साथ याच्या जोरावर श्रीलंकेने निर्धारीत 50 ओव्हरमध्ये 8 आऊट 251 रनपर्यंत मजल मारली.

(हे वाचा-IND vs ENG : भारताच्या पराभवानंतर वॉनचं खवचट ट्विट, जाफरचं सडेतोड प्रत्युत्तर)

सचिनचा सहज खेळ

स्पिन बॉलिंगला साथ देणाऱ्या इडन गार्डनच्या पिचवर 252 रनचं टार्गेट हे आव्हानात्मक होते. पण सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) त्या मॅचमध्ये पूर्ण भरात होता. नवजोत सिंग सिद्धू लवकर आऊट झाला. पण सचिनने संजय मांजेरकसोबत श्रीलंकेच्या बॉलर्सवर वर्चस्व गाजवले. सचिनने सहज अर्धशतक पूर्ण केले आणि भारताचा स्कोअर 100 च्या जवळ नेला. त्याचवेळी सचिन तेंडुलकर 65 रनवर जयसुर्याच्या बॉलिंगवर आऊट झाला.

सचिनची विकेट ही त्या मॅचमधील टर्निंग पॉईंट होता. 1 आऊट 98 या भक्कम धावसंख्येवरुन थोड्याच वेळात भारताची अवस्था 8 आऊट 120 अशी झाली. इडन गार्डनवर मॅच पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांसाठी हे सर्व धक्कादायक होते. 16 व्या ओव्हरमध्ये झालेल्या भारताच्या अवस्थेवर त्यांचा विश्वास बसत नव्हता. आठवी विकेट पडताच प्रेक्षकांच्या संतापाचा कडेलोट झाला.

प्रेक्षकांनी बाटल्या, कॅन आणि प्लॅस्टीक बॅग मैदानावर फेकण्यास सुरुवात केली. स्टेडियमवरील बॉल बॉयना उद्देशून देखील शेरेबाजी सुरु झाली.  श्रीलंकेचा कॅप्टन अर्जुन रणतुंगा याने बदललेल्या परिस्थितीमध्ये फिल्डिंग करण्यास नकार दिला. श्रीलंकेचे प्लेयर ड्रेसिंग रुममध्ये परतले तरी प्रेक्षक शांत झाले नव्हते. अखेर सामाना अधिकारी क्लाईव्ह लॉईड यांनी ही मॅच स्थगित करत श्रीलंकेला विजयी घोषित केले.

(हे वाचा :  On This Day : जेव्हा 434 रन केल्यानंतरही झाला होता ऑस्ट्रेलियाचा पराभव! )

कांबळीने रडत सोडले मैदान

भारतीय टीमची पडझड विनोद कांबळी एका बाजूने पाहत होता. सामनाअधिकाऱ्यांनी श्रीलंकेला विजयी घोषित करताच कांबळीला रडू आवरले नाही. त्याने रडत-रडत मैदान सोडले. त्यामुळे भारतीय फॅनसाठी त्रासदायक ठरलेल्या त्या मॅचचा शेवट हा आणखी शोकात्म झाला.

First published:

Tags: Black day, Cricket, India Vs Sri lanka, T20 world cup, Vinod kambli