मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /क्रिकेटमधील मोठा दिवस! आजच्याच दिवशी 50 वर्षांपूर्वी घडला होता इतिहास

क्रिकेटमधील मोठा दिवस! आजच्याच दिवशी 50 वर्षांपूर्वी घडला होता इतिहास

क्रिकेट फॅन्स (Cricket Fans) काही प्रसंग आणि तारखा कधीही विसरु शकत नाहीत. 6 मार्च हा दिवस देखील असाच आहे. भारतीय क्रिकेटच नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एका युगाला आजच्या दिवशी सुरुवात झाली.

क्रिकेट फॅन्स (Cricket Fans) काही प्रसंग आणि तारखा कधीही विसरु शकत नाहीत. 6 मार्च हा दिवस देखील असाच आहे. भारतीय क्रिकेटच नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एका युगाला आजच्या दिवशी सुरुवात झाली.

क्रिकेट फॅन्स (Cricket Fans) काही प्रसंग आणि तारखा कधीही विसरु शकत नाहीत. 6 मार्च हा दिवस देखील असाच आहे. भारतीय क्रिकेटच नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एका युगाला आजच्या दिवशी सुरुवात झाली.

मुंबई 06 मार्च : क्रिकेट फॅन्स (Cricket Fans) काही प्रसंग आणि तारखा कधीही विसरु शकत नाहीत. दरवर्षी 2 एप्रिल रोजी महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) मारलेला सिक्स आणि त्यानंतर टीम इंडियानं उंचावलेली क्रिकेट वर्ल्ड कप ट्रॉफी (Cricket World Cup 2011)  याची हमखास आठवण होते. 06 मार्च हा दिवस देखील असाच आहे. भारतीय क्रिकेटच नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एका युगाला आजच्या दिवशी सुरुवात झाली.

आज काय घडले?

स्वातंत्र्यानंतरच्या दोन दशकांमध्ये भारतामध्ये अनेक क्रिकेटपटू होऊन गेले. मात्र त्यापैकी कुणी सुपरस्टार नव्हता. एक असा क्रिकेटपटू नव्हता की ज्याच्या खेळाकडं संपूर्ण देशाचं नेहमी लक्ष लागलेलं असे. आजच्या दिवशी तो इतिहास बदलला.  पन्नास वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. (Sunil Gavaskar made his debut in international cricket)

बॉलर म्हणून सुरुवात

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बॅट्समन म्हणून अनेक विक्रम करणाऱ्या गावसकर यांनी खरं तर पहिल्याच दिवशी चक्क बॉलिंग केली होती. भारताचे तेंव्हाचे कॅप्टन अजित वाडेकर (Ajit Wadekar) यांनी बॉलिंगमध्ये बदल करताना गावसकर यांच्या हातामध्ये बॉल दिला होता. गावसकर यांनी एक ओव्हर टाकली. त्यामध्ये त्यांनी 9 रन दिले. वेस्ट इंडिजचा बॅट्समन रोहन कन्हाय (Rohan Kanhai) यांनी त्या ओव्हरमध्ये एक चौकार देखील मारला होता. क्रिकेट तज्ज्ञ मोहनदास मेनन (Mohandas Menon) यांनी ट्विटरवर ही आठवण शेअर केली आहे.

Today 50 years ago, a 21 year old man made his Test debut for India at POS. On the 1st day, he came in as the first change bowler. His third ball was cut ferociously by Rohan Kanhai to the ropes. In anger bowled a bouncer. Kanhai laughed!

He retired 16 yrs later with 10122 Test runs! pic.twitter.com/CUEyuXSEEC

— Mohandas Menon (@mohanstatsman) March 6, 2021

गावसकर यांचे विक्रम

गावसकर यांनी पहिल्या टेस्टमध्ये एकच ओव्हर केली. मात्र त्यानंतर त्यांनी बॅट्समन म्हणून पहिल्याच टेस्टमध्ये ठसा उमटवला होता. गावसकर यांनी त्या टेस्टमधील पहिल्या डावात 65 तर दुसऱ्या डावात नाबाद 67 रन केले होते.

(हे वाचा : सचिन, सेहवागने पुन्हा गाजवलं मैदान; 10 ओव्हर्समध्ये टीम इंडियाने जिंकली मॅच )

पहिल्या टेस्टमध्ये ठसा उमटवल्यानंतर गावसकर यांनी कधी मागं वळून पाहिलंच नाही. त्यांनी 125 टेस्टमध्ये 51.12 च्या सरासरीनं 10,122 रन केले. यामध्ये 34 शतक आणि 45 अर्धशतकांचा समावेश आहे. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात 10 हजार रनचा टप्पा पार करणारे गावसकर हे पहिले बॅट्समन होते.

First published:

Tags: Cricket, India, Sports, Sunil gavaskar, West indies, World record