मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

On This Day : जगाला पहिल्यांदा दिसली धोनीची पॉवर, पाकिस्तानची झाली होती वाताहत!

On This Day : जगाला पहिल्यांदा दिसली धोनीची पॉवर, पाकिस्तानची झाली होती वाताहत!

महेंद्रसिंह धोनीचे (MS Dhoni) फॅन्स आजची तारीख कधीही विसरु शकत नाहीत. आजच्या दिवशी 2005 साली (On This Day, 5 एप्रिल 2005) महेंद्रसिंह धोनीची क्रिकेट विश्वाला ओळख झाली होती.

महेंद्रसिंह धोनीचे (MS Dhoni) फॅन्स आजची तारीख कधीही विसरु शकत नाहीत. आजच्या दिवशी 2005 साली (On This Day, 5 एप्रिल 2005) महेंद्रसिंह धोनीची क्रिकेट विश्वाला ओळख झाली होती.

महेंद्रसिंह धोनीचे (MS Dhoni) फॅन्स आजची तारीख कधीही विसरु शकत नाहीत. आजच्या दिवशी 2005 साली (On This Day, 5 एप्रिल 2005) महेंद्रसिंह धोनीची क्रिकेट विश्वाला ओळख झाली होती.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 5 एप्रिल : महेंद्रसिंह धोनीचे (MS Dhoni) फॅन्स आजची तारीख कधीही विसरु शकत नाहीत. आजच्या दिवशी 2005 साली (On This Day, 5 एप्रिल 2005)  महेंद्रसिंह धोनीची क्रिकेट विश्वाला ओळख झाली होती. पाकिस्तान विरुद्ध विशाखापट्टणममध्ये (Visakhapatnam) झालेल्या वन-डे मध्ये धोनीनं पहिलं आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं. धोनीच्या या शतकामुळे भारतानं ती मॅच जिंकली. त्यानंतर धोनीनं कधीही मागं वळून पाहिलं नाही. 2005 साली झालेल्या त्या मॅचमध्ये पहिल्यांदा स्टेडियम 'धोनी, धोनी... ' या घोषणेनं दणाणून गेलं होतं. जी परंपरा आजही सुरू आहे.

धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण बांगलादेश विरुद्ध केलं होतं. त्याची पहिल्या चार मॅचमध्ये कामगिरी निराशाजनक झाली होती. त्याने चार मॅचमध्ये सातव्या क्रमांकावर बॅटींग करताना अनुक्रमे  0, 12, 7* आणि 3 रन काढले होते. या खराब कामगिरीनंतरही टीम मॅनेजमेंटनं धोनीला टीममध्ये कायम ठेवलं. इतकंच नाही, तर त्याच्या क्षमतेवर विश्वास दाखवत त्याला तिसऱ्या क्रमांकावर प्रमोशन दिलं. धोनीनं देखील टीम मॅनेजमेंटचा हा विश्वास सार्थ ठरवला.

148 रनची वादळी खेळी

पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये भारताची पहिल्यांदा बॅटींग होती. टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. सचिन तेंडुलकर फक्त 2 रन काढून आऊट झाला. सचिन आऊट होताच तिसऱ्या क्रमांकावर धोनी बॅटींगला आला. धोनीनं पहिल्याच बॉलवर फोर लगावत त्याचा आक्रमक मूड जाहीर केला होता.

धोनीनं 49 बॉलमध्ये त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. तर शतक पूर्ण करण्यासाठी 88 बॉल घेतले. 42 ओव्हरमध्ये धोनी आऊट झाला तेव्हा त्यानं 123 बॉलमध्ये 148 रन काढले होते. धोनीच्या या खेळीत 15 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. पाकिस्तानच्या सर्व बॉलर्सची त्यानं धुलाई केली.

धोनीच्या या शतकाच्या जोरावर भारतानं पाकिस्तान विरुद्ध 9 आऊट 356 असा विशाल स्कोअर उभा केला. पाकिस्तानला हे आव्हान पेलवलं नाही. भारतानं ती मॅच 58 रननं जिंकली. धोनीला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

On This Day :सलग 21 ओव्हर्स मेडन टाकणाऱ्या कंजूस बॉलरचा जन्म )

पाकिस्तान विरुद्ध सर्वोच्च खेळी

धोनीचे 148 रन ही तेव्हा कोणत्याही भारतीयानं पाकिस्तान विरुद्ध वन-डे मॅचमध्ये केलेला सर्वोच्च स्कोअर होता. यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली या दोघांनीही पाकिस्तान विरुद्ध 141 रन काढले होते. धोनीनं तो रेकॉर्ड मोडला. धोनीचा 148 रनचा रेकॉर्ड 2012 साली विराट कोहलीने (Virat Kohli) मोडला. त्यानं पाकिस्तान विरुद्ध 183 रन काढले.

First published:

Tags: Cricket, MS Dhoni, On this Day