• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • On This Day :सलग 21 ओव्हर्स मेडन टाकणाऱ्या कंजूस बॉलरचा जन्म

On This Day :सलग 21 ओव्हर्स मेडन टाकणाऱ्या कंजूस बॉलरचा जन्म

भारताचेच नाही तर क्रिकेट विश्वातील सर्वात कंजूस बॉलर असलेल्या बापू नाडकर्णी (Bapu Nadkarni) यांचा जन्म आजच्याच दिवशी (4 एप्रिल 1933) रोजी झाला.

 • Share this:
  मुंबई, 4 एप्रिल : क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात कमीत रन देणं हे प्रत्येक बॉलरचं ध्येय असतं. सध्याच्या टी20 क्रिकेटच्या युगात तर हे कंजूस बॉलरचं (economical bowler) चं महत्त्व आणखी वाढलं आहे. भारताचेच नाही तर क्रिकेट विश्वातील  सर्वात कंजूस बॉलर असलेल्या बापू नाडकर्णी (Bapu Nadkarni) यांचा जन्म आजच्याच दिवशी (4 एप्रिल 1933) रोजी झाला. बापू यांनी 1955 ते 1968 या काळात भारताकडून 41 टेस्ट खेळल्या. या संपूर्ण कारकीर्दीमध्ये त्यांचा इकॉनॉमी रेट होता फक्त 1.67! टेस्ट क्रिकेटमध्ये सलग 21 ओव्हर मेडन टाकण्याचा विक्रमही बापूंच्या नावावर आहे. बापू नाडकर्णी यांची अचूक बॉलिंग हा त्या काळात संशोधनाचा विषय होती. ते नेट्समध्ये किंवा प्रत्यक्ष मॅचमध्ये दीर्घकाळ सलग अचूक बॉलिंग करण्यासाठी ओळखले जात. 1960-61 च्या सिझनमध्ये पाकिस्तान विरुद्ध कानपूरमध्ये झालेल्या टेस्टमध्ये बापूंनी 32 ओव्हरमध्ये फक्त 23 रन दिले होते. यामध्ये त्यांनी 24 ओव्हर्स मेडन टाकल्या होत्या. त्यानंतर दिल्लीमध्ये झालेल्या टेस्टमध्ये त्यांनी 34 ओव्हर्समध्ये 24 ओव्हर्स मेडन टाकत फक्त 24 रन दिले.  1964 साली इंग्लंड विरुद्ध झालेल्या एका टेस्टमध्ये  तर इंग्लिश बॅट्समन त्यांच्याविरुद्ध रन काढण्यासाठी अक्षरश: प्रयत्नांची शर्थ करत होते. सलग 21 ओव्हर मेडन भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात मद्रासमध्ये ती टेस्ट मॅच झाली. या मॅचमध्ये लंचनंतर बापूंच्या हाती भारतीय कॅप्टननं बॉल दिला. त्यांच्या बॉलिंगपुढे इंग्लंडच्या बॅट्समनला काहीच उत्तर सापडत नव्हतं. बॉल खेळून काढणे हा एकच मार्ग त्यांच्यापुढे उपलब्ध होता. बापूंनी त्या मॅचमध्ये सलग 21 ओव्हर मेडन टाकल्या. 22 ओव्हरच्या पाचव्या बॉलवर त्यांच्या बॉलिंगवर पहिला रन निघाला. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर बापूंच्या सलग 130 बॉलवर इंग्लंडच्या बॅट्समनना एकही रन काढता आला नाही. बापूंची त्या दिवसाच्या अखेरीस  कामगिरी होती, 29 ओव्हर 26 मेडन आणि फक्त 3 रन! उपयुक्त बॅट्समन बापू नाडकर्णी हे कंजूस बॉलरसोबतच उपयुक्त बॅट्समन म्हणून देखील प्रसिद्ध होते. त्याने इंग्लंड विरुद्ध 1963-64 साली कानपूरमध्ये झालेल्या टेस्टमध्ये पहिल्या डावात 52 तर दुसऱ्या डावात 122 रनची खेळी केली होती. त्याने त्यांच्या टेस्ट कारकीर्दीमध्ये एक शतक आणि सात अर्धशतकं झळकावली. तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 40 पेक्षा जास्त सरासरीनं रन केले. मुंबईकडून खेळताना दिल्ली विरुद्ध त्यांनी नाबाद 283 रनची खेळी केली होती. ( वाचा : On This Day : 6,6,6,6 ब्रेथवेटच्या सलग चार सिक्स नंतर रडला होता बेन स्टोक्स! ) कंजूस बॉलर आणि उपयुक्त बॅट्समन असलेल्या बापू नाडकर्णी यांना आजच्या टी20 आणि IPL  क्रिकेटच्या युगात प्रचंड महत्त्व प्राप्त झालं असतं. आयपीएल क्रिकेटचा जन्म होण्याच्या 50 वर्ष आधी म्हणजेच 1968 साली बापू भारताकडून शेवटची टेस्ट मॅच खेळले. 17 जानेवारी 2020 रोजी वयाच्या 86 व्या वर्षी त्यांचं मुंबईमध्ये निधन झालं.
  Published by:News18 Desk
  First published: