मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG: आता टीम इंडियाचा पराभव अवघड! 54 वर्षांचा आहे जबरदस्त रेकॉर्ड

IND vs ENG: आता टीम इंडियाचा पराभव अवघड! 54 वर्षांचा आहे जबरदस्त रेकॉर्ड

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरी टेस्ट (India vs England 3rd Test) 25 ऑगस्टपासून हेडिंग्लेमध्ये सुरू होणार आहे. या मैदानात टीम इंडियाचा रेकॉर्ड जबरदस्त आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरी टेस्ट (India vs England 3rd Test) 25 ऑगस्टपासून हेडिंग्लेमध्ये सुरू होणार आहे. या मैदानात टीम इंडियाचा रेकॉर्ड जबरदस्त आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरी टेस्ट (India vs England 3rd Test) 25 ऑगस्टपासून हेडिंग्लेमध्ये सुरू होणार आहे. या मैदानात टीम इंडियाचा रेकॉर्ड जबरदस्त आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 18 ऑगस्ट : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरी टेस्ट (India vs England 3rd Test) 25 ऑगस्टपासून हेडिंग्लेमध्ये सुरू होणार आहे. पाच टेस्टच्या या सीरिजमध्ये टीम इंडियाकडं 1-0 नं आघाडी आहे. पहिली टेस्ट पावसामुळे ड्रॉ झाली. त्यानंतर भारतानं लॉर्ड्स टेस्टमध्ये इंग्लंडचा 151 रननं पराभव केला. आता तिसऱ्या टेस्टमध्ये हेडिंग्लेचे रेकॉर्ड कायम ठेवण्याच्या उद्देशानं टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. भारतीय टीम गेल्या 54 वर्षात भारतीय टीम हेंडिग्लेमध्ये एकही टेस्ट हरलेली नाही. या मैदानात भारतीय टीमनं आजवर 6 टेस्ट मॅच खेळल्या आहेत. यामध्ये 2 सामन्यात विजय मिळवला असून 3 मध्ये पराभव झाला आहे. पण हेडिंग्लेमधील मागील दोन्ही टेस्ट टीम इंडियानं जिंकल्या आहेत. या मैदानावर भारतीय टीमचा शेवटचा पराभव 1967 साली झाला होता.  1986 साली झालेल्या टेस्टमध्ये भारतानं इंग्लंडचा 279 रननं पराभव केला होता. त्यानंतर 2002 साली टीम इंडियानं हेडिंग्ले टेस्ट 1 इनिंग आणि 46 रननं जिंकली होती. सचिन-गांगुली-द्रविडचं शतक 22 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट दरम्यान झालेल्या या लढतीत भारतानं पहिल्यांदा बॅटींग करत 8 आऊट 628 रन केले. या इनिंगमध्ये सटिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली या तिघांनीही शतक झळकावले होते. तर संजय बांगरनं 68 रनची खेळी केली. इंग्लंडची टीम पहिल्या इनिंगमध्ये फक्त 273 रनच करु शकली. अनिल कुंबळे (Anil Kumble) आणि हरभजन सिंग (Harbhajan Singh) यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या होत्या. इंग्लंडची टीम दुसऱ्या इनिंगमध्येही फार कमाल करु शकली नाही. त्यांना फक्त 309 रन करता आले. कुंबळेनं दुसऱ्या इनिंगमध्ये 4 विकेट्स घेतल्या. राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूचा कहर! 40 बॉलमध्ये लगावले 10 सिक्स, 3 फोर संपूर्ण टीम पहिल्यांदा खेळणार टेस्ट टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीसह  (Virat Kohli) सध्याच्या टीममधील कोणत्याही खेळाडूनं आजवर हेडिंग्लेमध्ये टेस्ट मॅच खेळलेली नाही. त्यामुळे या टेस्टमध्ये सर्वांसाठी एक आव्हान असेल. विराट कोहली या सीरिजमध्ये आणखी एक टेस्ट जिंकला तर इंग्लंडमध्ये सर्वाधिक टेस्ट जिंकणारा भारतीय कॅप्टन होणार आहे. तसंच टीम इंडिया ही सीरिज हरणार नाही, हे देखील त्यावेळी निश्चित होईल.
First published:

Tags: Cricket, India vs england

पुढील बातम्या