मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /On This Day : IPL चा झाला जन्म, पहिल्याच मॅचमध्ये वेगवान शतकाचा विक्रम

On This Day : IPL चा झाला जन्म, पहिल्याच मॅचमध्ये वेगवान शतकाचा विक्रम

जागतिक क्रिकेटचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या आयपीएल स्पर्धेचा जन्म (IPL) आजच्याच दिवशी (On This Day) 2008 साली झाला. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यामध्ये आयपीएलची पहिली मॅच झाली.

जागतिक क्रिकेटचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या आयपीएल स्पर्धेचा जन्म (IPL) आजच्याच दिवशी (On This Day) 2008 साली झाला. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यामध्ये आयपीएलची पहिली मॅच झाली.

जागतिक क्रिकेटचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या आयपीएल स्पर्धेचा जन्म (IPL) आजच्याच दिवशी (On This Day) 2008 साली झाला. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यामध्ये आयपीएलची पहिली मॅच झाली.

मुंबई, 18 एप्रिल : भारतामध्येच नाही तर सध्या संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये आयपीएल (IPL) स्पर्धेची धूम सुरु आहे. आयपीएल स्पर्धेचा हा 14 वा सिझन आहे. सुमारे दोन महिने चालणाऱ्या या जगातील सर्वात प्रतिष्ठेच्या क्रिकेट लीगमध्ये खेळण्याचं अनेक खेळाडूंचं स्वप्न असतं. भारतासह  जगभरातील खेळाडूंना या स्पर्धेनं नवी ओळख, पैसा आणि प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. जागतिक क्रिकेटचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या या स्पर्धेचा जन्म आजच्याच दिवशी (On This Day) 2008 साली झाला.

कुणाची होती कल्पना?

बीसीसाआयचे तत्कालीन अधिकारी ललित मोदी (Lalit Modi) यांच्या डोक्यातील आयपीएल ही कल्पना होती. फुटबॉल लीग प्रमाणे भारतामधील शहरांच्या नावाच्या खासगी टीम या स्पर्धेत तयार झाल्या. मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरु, हैदराबाद, जयपूर आणि मोहाली या आठ शहरातील टीमना पहिल्या आयपीएलमध्ये परवागी देण्यात आली.

या टीममधील खेळाडूंची निवड लिलावाच्या (IPL Auction) माध्यमातून करण्यात आली. पहिल्या वर्षी झालेल्या लिलावात टीम इंडियाचा तेंव्हाचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीसाठी (MS Dhoni) सर्वाधिक बोली लागली होती. त्याला चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) खरेदी केले होते. तेंव्हापासून दरवर्षी आयपीएल स्पर्धेच्यापूर्वी होणारा लिलाव ही क्रिकेट विश्वातील मोठी घटना असते. या लिलावात दरवर्षी नवे विक्रम होतात. तसंच अनेक खेळाडू मालामाल होतात. तर काही दिग्गज खेळाडूंना कुणीही खरेदीदार मिळत नाही. आयपीएल नंतर जवळपास सर्वच क्रिकेट खेळणाऱ्या देशांच्या बोर्डांनी आपली लीग सुरु केली आहे. पण यापैकी कोणत्याही लीगला आयपीएल इतकी लोकप्रियता मिळालेली नाही.

पहिली मॅच कुणामध्ये झाली?

आजच्या दिवशी 14 वर्षांपूर्वी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यामध्ये आयपीएलची पहिली मॅच झाली. बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर ही मॅच होती. केकेआरचा कॅप्टन सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि आरसीबीचा कॅप्टन राहुल द्रविड (Rahul Dravid) होता. टीम इंडियाच्या दोन माजी कॅप्टनमध्ये झालेल्या पहिल्या मॅचचा टॉस राहुल द्रविडनं जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला.

मॅकलमनं केला रेकॉर्ड

केकेआरचा ओपनिंग बॅट्समन ब्रँडन मॅकलम (Brendon McCullum) याने पहिल्याच मॅचमध्ये T20 स्टाईल बॅटींग काय असते हे जगाला दाखवलं. त्यानं फक्त 73 बॉलमध्ये नाबाद 158 रन काढले. आरसीबीच्या सर्वच बॉलर्सची त्यानं धुलाई करत त्यानं या खेळीच्या दरम्यान 10फोर आणि 13 सिक्सची बरसात केली. मॅकलमच्या या आक्रमक दीड शतकामुळे केकेआरनं 20 ओव्हरमध्येच 3 आऊट 222 असा विशाल स्कोअर केला. मॅकलमचे 158 रन हा एक आयपीएल रेकॉर्ड होता. ख्रिस गेलनं 2013 साली तो रेकॉर्ड मोडला.

On This Day : डीव्हिलियर्सनं एका पायावर खेळून काढले होते 146 रन!

केकेआरनं दिलेलं 223 रनचं आव्हान आरसीबीला पेलवलं नाही. त्यांची संपूर्ण टीम 15.1 ओव्हरमध्येच फक्त 82 रनवरच आऊट झाली. केकेआरनं पहिली मॅच 140 रननं जिंकली.

First published:

Tags: BCCI, Cricket, IPL 2021, On this Day