मराठी बातम्या /बातम्या /देश /

क्लास बंक करुन विद्यार्थ्यांची पबमध्ये पार्टी, डान्सचा अश्लील VIDEO व्हायरल होताच कॉलेजनं उचललं मोठं पाऊल

क्लास बंक करुन विद्यार्थ्यांची पबमध्ये पार्टी, डान्सचा अश्लील VIDEO व्हायरल होताच कॉलेजनं उचललं मोठं पाऊल

सांकेतिक फोटो

सांकेतिक फोटो

आक्षेपार्ह डान्समुळे (offensive dance) कॉलेजची प्रतिमा मलिन झाल्यानं कॉलेज व्यवस्थापनानं काही विद्यार्थ्यांना नोटीस बजावली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मध्य प्रदेश, 11 डिसेंबर: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदूरमधील (Indore) एका पबमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल (viral video) झाला आहे. या व्हायरल व्हिडिओनंतर महाविद्यालयानं कारवाई केली आहे. विद्यार्थ्यांचे कपडे आणि आक्षेपार्ह डान्समुळे (offensive dance) कॉलेजची प्रतिमा मलिन झाल्यानं कॉलेज व्यवस्थापनानं काही विद्यार्थ्यांना नोटीस बजावली आहे.

ज्या विद्यार्थ्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ते विद्यार्थी इंदूरच्या होळकर सायन्स कॉलेजची आहेत. या पबमध्ये मुलांची फ्रेशर्स पार्टी होती. विशेष म्हणजे, हे सर्व विद्यार्थी क्लास बंक करुन पार्टी करण्यासाठी गेले होते. या पार्टीसाठी कोणीही कॉलेजकडून परवानगी घेतली नव्हती. त्याचबरोबर पबमध्ये विद्यार्थ्यांच्या कपड्यांसोबतच त्यांच्या डान्सच्या स्टेप्सही आक्षेपार्ह असल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा- Omicron Update: Corona च्या 'या' दोन लसी देतात 'कमी संरक्षण'- स्टडी

त्याचबरोबर डान्सदरम्यान विद्यार्थिनी आणि विद्यार्थी एकमेकांच्या अंगावर डोलतानाही दिसत आहेत. काही विद्यार्थिनींना विद्यार्थी उचलून घेताना दिसत आहेत. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याचवेळी एका विद्यार्थी लीडरला ही बाब कळताच त्यांनी तत्काळ तक्रार दाखल केली.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करणार

कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरेश सिलावट (Principal Suresh Silawat) यांनी सांगितलं की, तक्रारीच्या आधारे विद्यार्थ्यांना कारणे दाखवा नोटीस (Show Cause Notice). बजावण्यात आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात येत असून, ही समिती संपूर्ण प्रकरणाची चौकशी करेल. विद्यार्थ्यांशीही चर्चा करणार आहे. कॉलेज व्यवस्थापन विद्यार्थ्यांच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे.

फ्रेशर्स पार्टीला परवानगी देण्यात आली नाही

कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रम आणि अशा पार्ट्यांवर स्तरावर बंदी आहे. या विद्यार्थ्यांनी फ्रेशर्स पार्टीसाठी कॉलेज व्यवस्थापनाकडे परवानगी मागितल्याचं सांगण्यात आलं. मात्र प्राचार्य डॉ सुरेश सिलावट यांनी कोविड प्रोटोकॉलचा हवाला देत नकार दिला. असं असतानाही काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर ग्रुप बनवून पार्टीचे नियोजन केलं आणि नंतर पबमध्ये पार्टी केली. त्यानंतर या पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता कॉलेज प्रशासन कठोर भूमिका घेत आहे.

First published:

Tags: Indore