नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी : पाकिस्तानचा माजी सलामीवीर नासिर जमशेदला नुकतीच 17 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. नासिर जमशेदला पाकिस्तान सुपर लीगमध्ये स्पॉट फिक्सिंगप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. नासिर जमशेदनं पाकिस्तान सुपर लीग 2018 मध्ये इस्लामाबाद युनायटेड आणि पेशावर जाल्मी यांच्यात झालेल्या सामन्यावेळी खेळाडूंना मुद्दाम खराब खेळ करण्यास सांगितलं होतं. त्यानतंर जमशेदवर बंदी घालण्यात आली होती. आता त्याला 17 महिन्यांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे. नासिर जमशेदच्या या कृत्यामुळे कुटुंबाची इज्जत धुळीला मिळाल्याच्या भावना पत्नीने व्यक्त केल्या आहेत. त्याची पत्नी डॉक्टर समारा अफझल हिने एका पत्रातून तिचं म्हणणं मांडलं आहे.
नासिर जमशेदची पत्नी समाराने एक मेसेज दिला आहे. त्यात समाराने म्हटलं की, कोणत्याही क्रिकेटपटूने फिक्सिंगचा मार्ग निवडू नये. तसेच जमशेदच्या या कृत्याने माझी आणि सगळ्या कुटुंबाची मान खाली गेली.
नासिरचं भविष्य चांगलं असतं जर तो कष्ट करून खेळला असता. खेळाने नासिरला नाव कमवून दिलं. मात्र त्याने शॉर्ट कट घेतला आणि सगळंच गमावलं. नासिरला इंग्लंडचं नागरिकत्व मिळालं असतं. तो काउंटी खेळू शकला असता पण ही संधीही त्याने गमावली असंही समारा म्हणाली.
Today is the most difficult day of my life as Nasir starts his custodial sentence & I figure out what to tell my 4 year old.. I’ve felt the need to write this in the hope that others learn from Nasirs mistakes & no one goes through the pain we have suffered in the last 3 years. pic.twitter.com/fgkkMiglgz
— Dr Samara Afzal (@SamaraAfzal) February 7, 2020
आता नासिरच्या हातातून वेळ निघून गेली आहे. मला आशा आहे की इतर खेळाडू यातून धडा घेतील. भ्रष्टाचार केल्यास काय परिणाम होतात याचे हे उदाहरण आहे. एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू माझ्यासारख्या डॉक्टरपेक्षा कितीतरी पटीने जास्त पैसे कमावतात. तरीही ते भ्रष्टाचाराकडे का वळतात कळत नाही. देशासाठी खेळणं ही सन्मानाची गोष्ट असते.
सरकारला अंधारात ठेऊन पाकमध्ये पोहचला भारतीय संघ, VIRAL फोटोनं उडवली झोप
पाकिस्तानकडून खेळताना नासिरने त्याच्या लहानशा कारकिर्दीतही चांगली कामगिरी केली आहे. त्यानं एकूण 25 शतकं केली आहेत. यात 3 शतकं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असून ती सर्व भारताविरुद्धच आहेत.
असंही क्रिकेट! खेळपट्टी सोडून चेंडूच्या मागे धावला दिग्गज फलंदाज, VIDEO VIRAL
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket