जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / ICC ODI World Cup 2023 : क्रिकेट रसिकांसाठी खुशखबर! वनडे वर्ल्ड कपच्या तारखा ठरल्या

ICC ODI World Cup 2023 : क्रिकेट रसिकांसाठी खुशखबर! वनडे वर्ल्ड कपच्या तारखा ठरल्या

ICC ODI World Cup 2023 : क्रिकेट रसिकांसाठी खुशखबर! वनडे वर्ल्ड कपच्या तारखा ठरल्या

ICC ODI World Cup 2023 : क्रिकेट रसिकांसाठी खुशखबर! वनडे वर्ल्ड कपच्या तारखा ठरल्या

क्रिकेट रसिकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. यंदा भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपच्या तारखा ठरल्या असून ईएसपीएन क्रिकइन्फोने याबाबत अहवाल जाहीर केला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 22 मार्च : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेचा शेवटचा सामना होण्यापूर्वीच आता क्रिकेट रसिकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. यंदा भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपच्या तारखा ठरल्या असून ईएसपीएन क्रिकइन्फोने याबाबत अहवाल जाहीर केला आहे. यात वनडे वर्ल्ड कपच्या सुरुवातीपासून ते अंतिम सामन्यापर्यंतच्या अनेक गोष्टींविषयी माहिती देण्यात आली आहे. भारताच्या धर्तीवर यंदा खेळवण्यात येणाऱ्या वनडे वर्ल्ड कपला 5 ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे. 5 ऑक्टोबर ते 19  नोव्हेंबर या दरम्यान वनडे वर्ल्ड कपमध्ये तब्बल 48 सामने खेळवले जाणार असून यात तीन बाद फेऱ्या पारपडतील. भारतातील 12 शहरांमध्ये हे सामने खेळवले जाणार असून यात मुंबई सह हैदराबाद, कोलकाता, लखनौ, इंदूर, दिल्ली, लखनौ, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, गुवाहाटी, राजकोट या शहरांचा समावेश आहे. तसेच वनडे वर्ल्ड कपचा शेवटचा सामना हा अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येईल. IPL 2023 : आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’ अवॉर्ड जिंकणारे भारतीय क्रिकेटर्स

News18लोकमत
News18लोकमत

भारताने 2011 रोजी महेंद्र सिंह धोनी याच्या  भारताला पहिला वनडे वर्ल्ड कप जिंकून दिला होता. परंतु यानंतर अनेकदा सेमी फायनल पर्यंत धडक देऊनही भारतीय संघ पुन्हा वनडे वर्ल्ड कपवर नाव करू शकला नाही. तेव्हा यंदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 2023  चा वनडे वर्ल्ड कप जिंकण्याच लक्ष भारतीय संघाचं असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात