रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने तब्बल 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. रोहित शर्मा हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार असण्यासोबतच सर्वाधिक वेळा 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेटर्सच्या यादीत तो प्रथम स्थानी आहे. एक दोन नाही तर रोहितने तब्बल 18 वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा 'मॅन ऑफ द मॅच' अवॉर्ड जिंकणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आपल्या नेतृत्वाखाली चेन्नईला 4 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली असून तब्बल 17 वेळा धोनीने 'मॅन ऑफ द मॅच'चा पुरस्कार पटकावला आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचा धडाकेबाज फलंदाज युसूफ पठाण हा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. युसुफ पठाणने 16 वेळा 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार जिंकण्याचा विक्रम केला आहे.
Mr. IPL या नावाने प्रसिद्ध असलेला सुरेश रैना याने आतापर्यंत 14 'मैन ऑफ द मैच' अवार्ड जिंकले आहेत. त्याने चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळताना हे पुरस्कार जिंकले.
आरसीबी संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने 14 वेळा 'मैन ऑफ द मैच' अवार्ड जिंकले आहेत. दोन वर्ष विराट कोहली हा फॉर्ममध्ये नव्हता. त्यामुळे तो या यादीत पाचव्या स्थानावर आहे.