Home /News /sport /

NZ vs BAN : न्यूझीलंडने 3 दिवसांमध्येच हिशोब चुकता केला, टेलरची इमोशनल एक्झिट, VIDEO

NZ vs BAN : न्यूझीलंडने 3 दिवसांमध्येच हिशोब चुकता केला, टेलरची इमोशनल एक्झिट, VIDEO

टॉम लेथमच्या (Tom Latham) नेतृत्वात न्यूझीलंडने तीन दिवसांमध्येच बांगलादेशसोबतचा (New Zealand vs Bangladesh) आपला हिशोब चुकता केला आहे. याचसह रॉस टेलरने (Ross Taylor) टेस्ट क्रिकेटला अलविदा केलं आहे.

    मुंबई, 11 जानेवारी : टॉम लेथमच्या (Tom Latham) नेतृत्वात न्यूझीलंडने तीन दिवसांमध्येच बांगलादेशसोबतचा (New Zealand vs Bangladesh) आपला हिशोब चुकता केला आहे. सीरिजच्या पहिल्या टेस्टमध्ये बांगलादेशने न्यूझीलंडला हरवत मोठा उलटफेर केला होता, पण आता किवी टीमने या पराभवाचा बदला घेतला आहे. दुसरी टेस्ट मॅच फक्त तीन दिवसांमध्येच संपली आहे. न्यूझीलंडने बांगलादेशचा इनिंग आणि 117 रनने पराभव केला, याचसोबत सीरिज 1-1 ने बरोबरीत सुटली. न्यूझीलंडने पहिली इनिंग 521/6 वर घोषित केली, यानंतर बांगलादेशचा पहिल्या इनिंगमध्ये फक्त 126 रनवर ऑल आऊट झाला, त्यामुळे न्यूझीलंडने बांगलादेशला फॉलोऑन दिला. दुसऱ्या इनिंगमध्ये बांगलादेशचा 278 रनवर ऑल आऊट झाला. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लेथमने 252 रनची मॅरेथॉन खेळी केली. लेथमने या खेळीसोबतच मॅचमध्ये तब्बल 6 कॅच पकडले. या कामगिरीबद्दल लेथमला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. तर या सीरिजमध्ये 244 रन करणाऱ्या डेवॉन कॉनवेला प्लेयर ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं. दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये ट्रेन्ट बोल्टने सर्वाधिक 5 विकेट मिळवल्या, तर टीम साऊदीला 3 आणि काईल जेमिसनला 2 विकेट मिळाल्या. तर दुसऱ्या इनिंगमध्ये जेमिसनला 4 आणि वॅगनरला 3 विकेट घेण्यात यश आलं. लिट्टन दासने दुसऱ्या इनिंगमध्ये 102 रनची खेळी केली, पण त्याचं हे शतकही बांगलादेशला वाचवू शकलं नाही. याशिवाय कर्णधार मोमिनुल हकने 37 आणि नुरुल हसनने 36 रन केले. या मॅचसोबतच न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू रॉस टेलर (Ross Taylor) याने टेस्ट क्रिकेटला अलविदा केलं. या मोसमानंतर आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचं टेलरने आधीच सांगितलं होतं. न्यूझीलंडची या मोसमातली ही अखेरची टेस्ट होती, त्यामुळे हीच त्याची अखेरची टेस्ट ठरली. टेलर आपल्या करियरची अखेरची आंतरराष्ट्रीय मॅच 4 एप्रिलला हॅमिल्टनमध्ये खेळेल. टेलरनेच एबादत हुसैनला टॉम लेथमकरवी कॅच आऊट करून बांगलादेशची इनिंग 278 रनवर संपवली. याचसोबत आपल्या अखेरच्या टेस्ट बॉलवर विकेट घेण्याचा विक्रमही टेलरच्या नावावर झाला.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Bangladesh cricket team, New zealand

    पुढील बातम्या