मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Australian Openमध्ये 'जोकर'ने घडवला इतिहास, विजेतेपदानंतर घातलं खास जॅकेट

Australian Openमध्ये 'जोकर'ने घडवला इतिहास, विजेतेपदानंतर घातलं खास जॅकेट

djokovic

djokovic

Australian Open : जोकोविचला एक वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळता आलं नव्हतं. कोरोना प्रतिबंधक लस न घेतल्यानं त्याला परत पाठवण्यात आलं होतं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मेलबर्न, 29 जानेवारी : टेनिस स्टार नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात स्टेफानोस स्तीतीपासला 6-3, 7-6(4), 7-6(5), अशा फरकाने पराभूत करत विजेतेपद पटकावलं. त्याचं हे ऑस्ट्रेलियन ओपनमधलं दहावं तर एकूण 22 वे ग्रँड स्लॅम ठरले. जोकोविचला एक वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळता आलं नव्हतं. कोरोना प्रतिबंधक लस न घेतल्यानं त्याला परत पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर सरकारने घातलेले निर्बंध आता कमी केले असून लसीकरण न करताही यावेळी विजा मिळाला.

जोकोविचच्या नावावर आधी 9 ऑस्ट्रेलियन ओपनची विजेतेपदं होती. आता दहा विजेतेपदासह 22 ग्रँड स्लॅम त्याने जिंकली. यात सात विम्बल्डन, तीन अमेरिकन ओपन, दोन फ्रेंच ओपनच्या विजेतेपदांचा समावेश आहे. टेनिसच्या इतिहासात राफेल नदालसह त्याने 22 ग्रँड स्लॅम विजेतेपदांची बरोबरी केली. टेनिस जगतात जोकोविचला जोकर असंही म्हटलं जातं, तर ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये त्याला किंग ऑफ मेलबर्न अशा नावानेही ओळखतात.

हेही वाचा : Australian Open : जोकोविच पुन्हा नंबर वन, 22व्या ग्रँडस्लॅमवर कोरलं नाव

आपल्या 22 व्या ग्रँड स्लॅम विजेतेपदासाठी ऑस्ट्रेलियन ओपनच्या कोर्टवर उतरण्याआधीच जोकोविचने जॅकेटवर 22 आकडा छापला होता. विजेतेपद पटकावल्यानंतर त्याने आधीच तयार करून घेतलेलं खास जॅकेट घातलं होतं. सोशल मीडियावर त्याच्या या खास जॅकेटची जोरदार चर्चा आहे.. स्तितीपासविरुद्धच्या या ऐतिहासिक विजयानंतर जोकोविचला अश्रू अनावर झाले.

ऑस्ट्रेलियन ओपन जिंकताच जोकोविच एटीपी रँकिंगमध्ये जगात पुन्हा एकदा नंबर वन ठरला आहे. तर जोकोविचविरुद्ध पराभवामुळे स्तितीपासचं पुन्हा एकदा पहिल्या ग्रँड स्लॅम विजयापासून दूर रहावं लागलं. याआधीही त्याला 2021 मध्येही जोकोविचकडूनच फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.

First published:

Tags: Tennis player