मेलबर्न, 29 जानेवारी : ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद नोवाकने पटकावले. पहिले दोन्ही सेट जोकोविचने जिंकले होते. त्यानतंर तिसऱ्या स्टेमध्ये त्सितीपासने जोकोविचला झुंजवले. तिसरा सेट बरोबरीत राहिल्यानतंर अखेर सामन्याचा निकाल टाय ब्रेकरवर लागला. जोकोविचने या विजेतेपदासह राफेल नदालच्या २२ ग्रँड स्लॅम विजेतेपदाची बरोबरी केली.
ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात जोकोविचला त्सितिपासने विजयासाठी जबरदस्त अशी झुंज दिली. जोकोविचने पहिला सेट 6-3 असा जिंकला होता. त्यानतंर त्सितीपासने त्याला जोरदार टक्कर दिली, मात्र दुसरा सेटही जोकोविचने 7-6 असा जिंकला. तर तिसऱ्या सेटमध्ये टायब्रेकरवर 7-6 अशा फरकाने मात करत जोकोविचने विजेतेपदाला गवसणी घातली. अंतिम सामना जवळपास तीन तास चालला.
हेही वाचा : कोण आहे रोहन बोपन्नाची पत्नी? चाहत्याने म्हटलं सर्वात सुंदर स्त्री, टेनिस स्टारने दिलं उत्तर
जोकोविचने दहाव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली. या विजयासह त्याने राफेल नादालच्या २२ ग्रँड स्लॅम विजेतेपदाची बरोबरी केली. पुन्हा एकदा एटीपी रँकिंगमध्ये जोकोविचने पहिलं स्थान पटकावलं आहे. गेल्या जून महिन्यात कार्लोस अल्कारेझने जोकोविचला मागे टाकलं होतं. जोकोविचने आतापर्यंत दहा वेळा ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे आणि दहाही वेळा विजेतेपद पटकावलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tennis player