Home /News /sport /

टीम इंडियात संधी नाही, आता इंग्लंडमध्ये खेळणार भारताचा ऑलराऊंडर!

टीम इंडियात संधी नाही, आता इंग्लंडमध्ये खेळणार भारताचा ऑलराऊंडर!

Photo-BCCI

Photo-BCCI

टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर (India vs England) आहे. दोन्ही टीममध्ये टेस्ट मॅच सुरू आहे, या सामन्यानंतर टी-20 (T20 Series) आणि वनडे मॅचची सीरिज (ODI Series) होणार आहे. या दोन्ही सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे, पण टीममध्ये आक्रमक ऑलराऊंडरला संधी मिळाली नाही, त्यामुळे आता त्याने इंग्लंडमध्ये जाऊन क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 3 जुलै : टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर (India vs England) आहे. दोन्ही टीममध्ये टेस्ट मॅच सुरू आहे, या सामन्यानंतर टी-20 (T20 Series) आणि वनडे मॅचची सीरिज (ODI Series) होणार आहे. या दोन्ही सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे, पण टीममध्ये आक्रमक ऑलराऊंडरला संधी मिळाली नाही, त्यामुळे आता त्याने इंग्लंडमध्ये जाऊन क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियातल्या वाढत्या स्पर्धेमुळे कृणाल पांड्या (Krunal Pandya) बाहेर आहे, त्यामुळे आता तो इंग्लंडमध्ये जाऊन खेळणार आहे. फॉर्ममध्ये परतण्यासाठी तो रॉयल लंडन वनडे चॅम्पियनशीपमध्ये खेळताना दिसेल. ही स्पर्धा 2 ते 23 ऑगस्टदरम्यान खेळवली जाणार आहे. कृणाल पांड्याने या स्पर्धेसाठी वारविकशायरसोबत करार केला आहे. पांड्याशिवाय वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) लँकशायरकडून खेळताना दिसेल. 'कृणाल आमच्या क्लबसाठी शानदार खेळाडू ठरेल. मला त्याचं एजबॅस्टनमध्ये स्वागत करताना आनंद होत आहे. त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचाही अनुभव आहे, असं वारविकशायरचे क्रिकेट डायरेक्टर पॉल फारब्रेस म्हणाले. कृणाल पांड्या टीम इंडियाकडून 5 वनडे आणि 19 टी-20 मॅच खेळला आहे. त्याने 2021 साली इंग्लंडविरुद्ध वनडेमध्ये पदार्पण केलं होतं. वारविकशायरकडून खेळण्याची संधी मिळत असल्यामुळे मी उत्साही आहे. क्लबसोबत खेळताना मी महत्त्वाचं योगदान देईन, असा विश्वास मला आहे, असं कृणाल पांड्या म्हणाला. कृणाल पांड्या याआधी आयपीएल 2022 मध्ये लखनऊ सुपर जाएंट्सकडून खेळताना दिसला. आपली पहिलीच आयपीएल खेळणारी लखनऊ या मोसमात प्ले-ऑफपर्यंत पोहोचली. लखनऊकडून खेळण्याआधी कृणाल मुंबई इंडियन्सच्या टीमचा महत्त्वाचा खेळाडू होता. मुंबईला चॅम्पियन बनवण्यात कृणाल पांड्याने मोलाची भूमिका बजावली होती. आयपीएल 2017 च्या फायनलमध्ये कृणालने मॅच विनिंग खेळी केली होती आणि मुंबईला आयपीएल ट्रॉफी जिंकवून दिली होती.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs england, Krunal Pandya, Team india

    पुढील बातम्या