रावळपिंडी, 10 सप्टेंबर : न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजआधी पाकिस्तानवर (Pakistan vs New Zealand) मोठी नामुष्की ओढावली आहे. न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सीरिजमध्ये डीआरएस (DRS) म्हणजेच डिसीजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर केला जाणार नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आणि प्रसारकांना डीआरएस उपलब्ध करून देणारी कोणतीही मान्यताप्राप्त कंपनी मिळाली नाही, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातली वनडे सीरिज 17 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
कोणत्याही सीरिजसाठी डीआरएस टेक्नोलॉजी फक्त आयसीसीने (ICC) मंजुरी दिलेली कंपनीच देऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डीआरएस टेक्नोलॉजी इंग्लंडविरुद्ध ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या दोन टी-20 मॅचसाठी उपलब्ध असेल.
पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात तीन वनडे आणि पाच टी-20 मॅचची सीरिज होणार आहे. वनडे मॅच रावळपिंडीमध्ये 17, 19 आणि 21 सप्टेंबर रोजी होणार आहेत. यानंतर लाहोरमध्ये टी-20 सीरिज होईल.
अंपायरने दिलेला निर्णय पटला नाही, तर टीमचा कर्णधार डीआरएस घेऊ शकतो. यानंतर व्हिडिओ रिप्ले, बॉल ट्रॅकर, हॉक आय, हॉट स्पॉट, पिच मॅपिंगच्या मदतीने थर्ड अंपायर खेळाडू आऊट का नॉट आऊट याचा निर्णय घेतो.
सीरिजवर कोरोनाचं संकट
पाकिस्तानचा डावखुरा स्पिनर मोहम्मद रिझवान याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, त्यामुळे तो आगामी वनडे सीरिजमध्ये खेळणार नाही. त्याला 10 दिवसांसाठी हॉटेलमध्येच क्वारंटाईन करण्यात आलं आहे. पाकिस्तान टीमचे इतर खेळाडू निगेटिव्ह आले आहेत, त्यामुळे ते शुक्रवारपासून पिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये सरावाला सुरुवात करतील. न्यूझीलंडची टीम शनिवारी पाकिस्तानला पोहोचणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.