मुंबई, 27 मार्च : महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात मुंबईने दिल्लीवर ७ विकेट राखून विजय मिळवत पहिलं वहिलं विजेतेपद पटकावलं. ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांना पहिल्या षटकात फक्त दोनच धावा करता आल्या. तर दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर शफालीने षटकार मारला. पुढच्या चेंडूवर चौकार मारला. तर तिसरा चेंडू फुलटॉस होता आणि त्यावर शफाली वर्मा झेलबाद झाली.
शफालीने चेंडू मारताच नॉन स्ट्राइकला असलेली कॅप्टन मेग लॅनिंग आणि शफालीनेही मैदानावरील पंचांना प्रश्न विचारला. वेस्ट हाइटचा नो बॉल असल्याबाबत इशारा दोघींनी केला. पण मैदानी पंचांनी तिला बाद दिलं. तेव्हा महिला प्रीमियर लीगच्या नियमानुसार चेंडू नो बॉल होता की एक फुलटॉस होता हे पाहण्यात आलं.
BCCIच्या वार्षिक करारात जडेजाला लॉटरी, 7 खेळाडू बाहेर तर 6 जणांना संधी
तिसऱ्या पंचांनी चेंडूची उंची पाहिली. तसंच शफाली कुठे खेळत होती तेसुद्धा चेक करण्यात आलं. यानंतर चेंडू वेस्ट हाइट असल्याचं वाटत होतं. याशिवाय स्टम्पच्या वरूनही चेंडू जात असल्याचं दिसत होतं. तिसऱ्या पंचांनी मैदानी पंचांचा निर्णय न बदलता शफाली वर्माला बाद दिलं.
No ball or fair delivery? 👀
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 26, 2023
शफाली वर्माच्या विकेटवरून सोशल मीडियावर प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. दिल्ली कॅपिटल्सने केलेल्या ट्विटवरसुद्धा उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत.
नो बॉल न देण्याचं कारण शफाली थोडी खाली वाकल्याचं म्हटलं जात आहे. नो बॉल तेव्हाच दिला जातो जेव्हा एखादा फलंदाज ताठ उभा असेल आणि चेंडू वेस्ट हाइटपासून वरती असेल. शफालीने चेंडू ज्या स्थितीत मारला ते पाहता तो नो बॉल नव्हता असंच दिसतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.