मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /BCCIच्या वार्षिक करारात जडेजाला लॉटरी, 7 खेळाडू बाहेर तर 6 जणांना संधी

BCCIच्या वार्षिक करारात जडेजाला लॉटरी, 7 खेळाडू बाहेर तर 6 जणांना संधी

बीसीसीआयने जाहीर केलेल्या नव्या वार्षिक करारात एकूण २६ खेळाडूंची नावे आहेत. यातून ७ जणांना वगळण्यात आले असून ६ नव्या क्रिकेटर्सना संधी देण्यात आलीय. केएल राहुल, शार्दुल ठाकूर यांना फटका बसला.

बीसीसीआयने जाहीर केलेल्या नव्या वार्षिक करारात एकूण २६ खेळाडूंची नावे आहेत. यातून ७ जणांना वगळण्यात आले असून ६ नव्या क्रिकेटर्सना संधी देण्यात आलीय. केएल राहुल, शार्दुल ठाकूर यांना फटका बसला.

बीसीसीआयने जाहीर केलेल्या नव्या वार्षिक करारात एकूण २६ खेळाडूंची नावे आहेत. यातून ७ जणांना वगळण्यात आले असून ६ नव्या क्रिकेटर्सना संधी देण्यात आलीय. केएल राहुल, शार्दुल ठाकूर यांना फटका बसला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 27 मार्च : बीसीसीआयने शनिवारी रात्री नव्या वार्षिक कराराची घोषणा केली. नव्या करारात एकूण २६ खेळाडूंना समाविष्ट करण्यात आलंय. यात चार खेळाडू असे आहेत ज्यांना कामगिरीच्या आधारावर प्रमोट करण्यात आलंय. तर दोन खेळाडूंची ग्रेड कमी करण्यात आलीय. तर ७ जणांचा करार संपुष्टात आला. त्यांच्या जागी नव्या ६ जणांना संधी मिळाली आहे.

नव्या करारात ए प्लसमध्ये ४, ए कॅटेगरीत ५, बी कॅटेगरीत ६ आणि सी कॅटेगरीत ११ खेळाडुंचा समावेश आहे. हा करार ऑक्टोब २०२२ ते सप्टेंबर २०२३ पर्यंत असेल. यात ए प्लस खेळाडुंना ७ कोटी रुपये, ए कॅटेगरीतील खेळाडूंना ५ कोटी रुपये, बी कॅटेगरीसाठी ३ तर सी कॅटेगरीतील खेळाडूंना प्रत्येकी १ कोटी रुपये मिळतील.

बीसीसीआयने वार्षिक करारात अष्टपैलू क्रिकेटर जडेजाला ए प्लस कॅटेगरीत प्रमोट केलंय. गेल्या वर्षीपर्यंत जडेजा ए कॅटेगरीत होता. आता तो रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह यांच्या पंक्तीत बसला आहे. अष्टपैलू क्रिकेटर हार्दिक पांड्याला मोठी लॉटरी लागली असून तो सी ग्रेडमधून थेट ए ग्रेडमध्ये पोहोचला आहे. तर अक्षर पटेलसुद्धा बी कॅटेगरीमधून ए कॅटेगरीत पोहोचला आहे. टी२० क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलेल्या सूर्यकुमार यादवला प्रमोट करण्यात आलंय. तो सी कॅटेगरीतून बी कॅटेगरीत पोहोचलाय.

लग्न एक मॅच, मला या फिल्डचा अंदाज नव्हता; घटस्फोटावर धवनने सोडलं मौन 

केएल राहुल, शार्दूल ठाकुरला दणका

बीसीसीआयच्या करारात काही खेळाडूंना नुकसान झालं. यामध्ये केएल राहुल आणि शार्दुल ठाकुरचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटमधील कामगिरीमुळे केएल राहुलवर टीका होत आहे. त्याला उपकर्णधारपदही गमवावं लागलं. त्यानंतर आता ए कॅटेगरीमधून केएल राहुल बी कॅटेगरीत करारबद्ध झाला. तर शार्दुल ठाकूरला बी मधून सी मध्ये डिमोट करण्यात आलंय.

७ खेळाडूंना बाहेरचा रस्ता, ६ जणांना संधी

नव्या वार्षिक करारातून ७ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यामध्ये अजिंक्य रहाणे, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, ऋद्धिमान साहा आणि दिपक चाहर यांचा समावेश आहे. त्यांच्या जागी सहा नव्या खेळाडूंना संधी दिली आहे. बीसीसीआयने इशान किशन, दीपक हुड्डा, केएस भरत, अर्शदीप सिंह यांना पहिल्यांदाच करारबद्ध केलं. तर कुलदीप यादव, संजू सॅमसन यांच्यासोबत पुन्हा करार करण्यात आला. हे सर्व खेळाडू सी ग्रेडमध्ये आहेत.

First published:
top videos

    Tags: BCCI, Cricket, Ravindra jadeja