स्टोक पार्क/ मुंबई 28 जून 2023 : रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्ष नीता अंबानी यांनी बकिंगहॅमशायरमधील स्टोक पार्क येथे आयोजित, द बूडल्स टेनिस स्पर्धेत डिएगो श्वार्ट्जमॅनला रिलायन्स फाउंडेशनचा ईएसए कप प्रदान केला. द बूडल्स टेनिस स्पर्धा ही विंबल्डन स्पर्धेपूर्वीची सर्वोत्तम सराव टेनिस स्पर्धा मानली जाते. स्टोक पार्कमध्ये खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेचे यंदा 19 वे वर्ष आहे. ही स्पर्धा 27 जून ते 1 जुलै 2023 दरम्यान होत आहे. पाच दिवस चालणाऱ्या या टेनिस स्पर्धेत रोज रिलायन्स फाउंडेशन ईएसएस कप पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. टेनिस स्पर्धेच्या पहिल्या दिवशी रिलायन्स फाउंडेशनच्या नीता अंबानी यांनी विजेता डिएगो श्वार्ट्जमॅनला पहिला रिलायन्स फाउंडेशन ईएसए कप प्रदान केला. त्यांनी यूकेमधील बकिंगहॅमशायरमधल्या ‘अॅक्शन फॉर युथ’च्या मदतीसाठी निधीदेखील दिला. `अॅक्शन फॉर युथ`चा आजचा विजेता डिएगो श्वार्ट्जमनसाठी हा गौरवही अत्यंत महत्त्वाचा आहे. IND vs IRE schedule : आयर्लंड विरुद्ध 3 सामन्यांची मालिका खेळणार टीम इंडिया; कोणाला मिळणार संधी? या वेळी रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापिका आणि अध्यक्ष नीता अंबानी म्हणाल्या, की ``येथील वातावरण अप्रतिम आहे. आम्हाला येथे उत्कृष्ट टेनिस बघायला मिळालं. खेळासोबतच धर्मादाय सेवा करण्याची संधी मिळाल्याने ते आणखी अर्थपूर्ण झालं आहे. मी सर्व युवकांना शुभेच्छा देते आणि आशा करते की त्यांनी त्यांच्या आवडीचा कोणताही खेळ निवडावा आणि त्यातून स्वतःमध्ये तसेच सभोवतालच्या लोकांमध्ये उत्साह, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करावा.`` ICC World Cup : मौका मौका! भारत पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, वनडे वर्ल्ड कपच वेळापत्रक जाहीर `द बूडल्स 2023` मध्ये टेनिस सुपरस्टार्सचा मेळा भरला आहे. जगातील अव्वल 20 पुरुष टेनिसपटूंपैकी सात टेनिसपटू या वर्षी द बूडल्समध्ये सहभागी झाले आहेत. यात टेनिसस्टार स्टेफानोस सितसिपास (जागतिक क्रमवारी 5), होल्गर रुण (जागतिक क्रमवारी 6) आणि अँड्री रुबलेव (जागतिक क्रमवारी 7) यांचा समावेश आहे. कोविड महामारीनंतर पुन्हा स्पर्धा सुरू झाल्याने टेनिस कोर्ट गजबजलं आहे. दीर्घकाळानंतर पुन्हा सुरू झालेल्या या टेनिस स्पर्धेमुळे टेनिसप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. भारताच्या स्पोर्ट्स लीडर नीता अंबानी या विविध क्रीडा प्रकारांशी थेट संबंधित आहेत. त्या आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या सदस्य म्हणून निवडल्या गेलेल्या पहिल्या भारतीय महिला आहेत. नीता अंबानी यांनी भारतातील क्रीडा क्षेत्रात पायाभूत सुविधा विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच ऑलिम्पिक खेळांमधील विविध अॅथलेटिक्स संघटना आणि विविध क्रीडापटूंना पाठिंबा देऊन भारतातील ऑलिम्पिक चळवळ पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.