मुंबई, 28 फेब्रुवारी : वेलिंग्टन येथे इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा 1 धावांनी पराभव केला आहे. इंग्लंडला विजयासाठी 258 धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण, इंग्लंडचा संघ 256 धावांत ऑलआऊट झाला. अशाप्रकारे न्यूझीलंडने कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
नील वॅगनर हा न्यूझीलंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला. दुसऱ्या डावात त्याने 4 बळी घेतले. यापूर्वी 1993 मध्ये अॅडलेड कसोटीत वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाचा 1 धावाने पराभव केला होता. 30 वर्षांनंतर न्यूझीलंडने हा करिष्मा करून दाखवला आहे.
'भारतात धावा केल्या नाहीत तर....' के एल राहुलबाबत बीसीसीआयच्या माजी अध्यक्षाने केल वक्तव्य
कसोटी इतिहासात ही चौथी वेळ आहे, जेव्हा संघाने फॉलोऑन खेळताना सामना जिंकला. इंग्लंडला विजयासाठी 258 धावांचे लक्ष्य मिळाले होते. परंतु सामना सुरु होताच इंग्लंडने 80 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या. पण जो रूट आणि कर्णधार बेन स्टोक्स यांनी सहाव्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी करत इंग्लंडचे सामन्यात पुनरागमन केले. यानंतर बेन फॉक्सनेही 35 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पण, फॉक्स बाद होताच इंग्लंडचा डाव गडगडला. इंग्लंडच्या शेवटच्या जोडीला 7 धावा करता आल्या नाहीत. पण, शेवटचा बाद झालेला फलंदाज तसाच राहिला. तेव्हा नील वॅगनरने त्याची विकेट घेऊन त्याला तंबूत धाडले.
नील वॅगनर हा न्यूझीलंडच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने दुसऱ्या डावात 62 धावांत 4 बळी घेतले. त्याच्याशिवाय कर्णधार टीम साऊदीने ३ बळी घेतले. मॅट हेन्रीही 2 बळी घेण्यात यशस्वी ठरला. टीम साऊदीच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडचा हा पहिला विजय आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, England, Sports, Test cricket