मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

बेन स्टोक्सनंतर भारतीय खेळाडूही देणार निवृत्तीचा धक्का, शास्त्रींनी सांगितली Inside Story

बेन स्टोक्सनंतर भारतीय खेळाडूही देणार निवृत्तीचा धक्का, शास्त्रींनी सांगितली Inside Story

इंग्लंडचा दिग्गज ऑलराऊंडर बेन स्टोक्सने (Ben Stokes) मागच्या आठवड्यात वनडे क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली. यानंतर आता टीम इंडियाचा खेळाडूही वनडे फॉरमॅट सोडेल, अशी भविष्यवाणी रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी केली आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 23 जुलै : इंग्लंडचा दिग्गज ऑलराऊंडर बेन स्टोक्सने (Ben Stokes) मागच्या आठवड्यात वनडे क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली. स्टोक्सच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला. क्रिकेटचे तिन्ही फॉरमॅट खेळणं शारिरिकदृष्ट्या शक्य नसल्याचं कारण देत स्टोक्सने वनडे क्रिकेटला अलविदा केलं. भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्या मते भविष्यात टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याही (Hardik Pandya) वनडे क्रिकेटमधून संन्यास घेईल. 2023 च्या वनडे वर्ल्ड कपनंतर (World Cup 2023) हार्दिक पांड्या वनडे क्रिकेट सोडेल, असं भाकीत शास्त्री यांनी केलं आहे. स्टोक्सच्या निवृत्तीनंतर वनडे फॉरमॅटच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. येत्या काही काळात वनडे क्रिकेटचा अंत होईल, असं मत अनेक दिग्गज खेळाडूंनी व्यक्त केलं आहे.

2021 आणि 2022 या दोन वर्षी टी-20 वर्ल्ड कप असल्यामुळे मागच्या दोन्ही वर्षी प्रत्येक टीमने टी-20 फॉरमॅटला महत्त्व दिलं. त्यातच क्रिकेट रसिकांमध्ये वनडे क्रिकेटबाबत फारशी उत्सुकता राहिलेली दिसत नाही. हार्दिक पांड्याच्या वनडे क्रिकेटच्या भवितव्याबाबत शास्त्री स्काय स्पोर्ट्सच्या कॉमेंट्रीमध्ये बोलत होते. 'हार्दिकचे विचार स्पष्ट आहेत, त्याला टी-20 क्रिकेट खेळायचं आहे. तो इतर प्रकारच्या क्रिकेटवर फार लक्ष देणार नाही,' असं शास्त्री म्हणाले.

'खेळाडू आता कोणता फॉरमॅट खेळायचा हे आधीच ठरवत आहेत. हार्दिक पांड्याकडेच बघा, त्याला टी-20 खेळायचं आहे. त्याच्या डोक्यात ही गोष्ट स्पष्ट आहे, त्याला दुसरं काहीही खेळायची इच्छा नाही. हार्दिक पुढच्या वर्षीच्या वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळेल, पण त्यानंतर तो या फॉरमॅटमधून संन्यास घेईल,' असं वक्तव्य रवी शास्त्री यांनी केलं.

'तो 50 ओव्हरचा वर्ल्ड कप खेळेल, कारण तो भारतात होणार आहे. त्यानंतर तो कदाचित तिकडे दिसणार नाही. इतर खेळाडूंच्या बाबतीतही तुम्हाला हेच दिसेल. ते आता फॉरमॅट निवडायला सुरूवात करतील, त्यांना याचा पूर्ण अधिकार आहे,' असं शास्त्रींनी सांगितलं.

2022 या वर्षात हार्दिक पांड्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. गेल्या काही काळापासून हार्दिक दुखापतीमुळे टीम इंडियाच्या बाहेर होता. यावर्षी आयपीएलमध्ये हार्दिकच्या नेतृत्वात पहिल्यांदाच खेळणारी गुजरात टायटन्स विजयी झाली. हार्दिकचंही हे कॅप्टन्सीचं पदार्पण होतं. आयपीएलनंतर टी-20 आंतरराष्ट्रीयमध्येही हार्दिक धमाकेदार कामगिरी करत आहे.

First published:

Tags: Ben stokes, Hardik pandya, Ravi shastri, Team india