मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Tokyo Olympics : BCCI ने तिजोरी उघडली, गोल्डन बॉय नीरजसह विजेत्यांना भरघोस मदत

Tokyo Olympics : BCCI ने तिजोरी उघडली, गोल्डन बॉय नीरजसह विजेत्यांना भरघोस मदत

नीरज चोप्राला दोन दिवसांपासून ताप

नीरज चोप्राला दोन दिवसांपासून ताप

बीसीसीआयने शनिवारी टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) मेडल जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंसाठी पुरस्काराची घोषणा केली आहे. भालाफेकमध्ये (Men's javelin throw) गोल्ड मेडल पटकावणाऱ्या नीरज चोप्राला (Neeraj Chopra) बीसीसीआय (BCCI) एक कोटी रुपये देणार आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 7 ऑगस्ट : बीसीसीआयने शनिवारी टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) मेडल जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंसाठी पुरस्काराची घोषणा केली आहे. भालाफेकमध्ये (Men's javelin throw) गोल्ड मेडल पटकावणाऱ्या नीरज चोप्राला (Neeraj Chopra) बीसीसीआय (BCCI) एक कोटी रुपये देणार आहे. नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत भारताला स्पर्धेतलं पहिलं गोल्ड मेडल मिळवून दिलं. ऑलिम्पिक इतिहासात भारताला हे दुसरं वैयक्तिक गोल्ड मेडल मिळालं आहे.

बीसीसीआय सचिव जय शाह (Jay Shah) यांनी ट्वीट करून या पुरस्काराची घोषणा केली. सिल्व्हर मेडल जिंकणाऱ्या मीराबाई चानू (Mirabai Chanu) आणि पैलवान रवी दहिया (Ravi Dahiya) यांना प्रत्येकी 50-50 लाख रुपये मिळणार आहेत, तर पैलवान बजरंग पुनिया (Bajrang Punia), बॉक्सर लवलीना बोरगोहन (Lovlina Borgohain) आणि बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) यांना प्रत्येकी 25-25 लाख रुपये मिळणार आहेत. भारताच्या पुरुष हॉकी टीमने 41 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावलं, त्यांना 1.25 कोटी रुपये मिळणार आहेत.

हरियाणा सरकारकडून मदत

'नीरज चोप्राला हरियाणा सरकारच्या पॉलिसीनुसार 6 कोटी रुपये आणि क्लास-1 नोकरी दिली जाईल. तसंच खेळाडूंसाठी आम्ही पंचकुलामध्ये कौशल्य केंद्र उभारत आहोत, या केंद्रावर आम्ही नीरज चोप्राची इच्छा असेल तर त्याला प्रमुख म्हणून नियुक्त करू. तसंच त्याला इतर खेळाडूंप्रमाणेच 50 टक्के सवलतीमध्ये जमीन विकत घेता येईल,' अशी घोषणा हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांनी केली आहे.

भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये नीरज चोप्रा याने पहिल्याच प्रयत्नात तब्बल 87.03 मीटर लांब भाला फेकत सुरुवातीलाच आघाडी घेतली, पण दुसऱ्या थ्रोमध्ये तर त्याने तब्बल 87.58 मीटर भाला फेकला. नीरजची ही आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली.

100 वर्षांपेक्षा जास्त काळानंतर भारताला पहिल्यांदाच ऍथलिटिक्समध्ये गोल्ड मेडल मिळालं आहे. नीरज भारताकडून वैयक्तिक गोल्ड मेडल मिळवणारा दुसरा खेळाडू आहे. याआधी निशाणेबाज अभिनव बिंद्राला 2008 ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एयर रायफल प्रकारात गोल्ड मेडल मिळालं होतं.

First published:

Tags: BCCI, Olympics 2021