मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /पाकिस्तानकडून भारत हरल्यास, मोदी गायब होतील आणि..., जावेद मियाँदाद सोडली पातळी

पाकिस्तानकडून भारत हरल्यास, मोदी गायब होतील आणि..., जावेद मियाँदाद सोडली पातळी

पाकिस्तानपासून पळण्याची भारताची जुनीच सवय आहे. यात नवं असं काही नाही. मी खेळत होतो तेव्हापासून त्यांना ओळखतो असंही जावेद मियाँदादने म्हटलं.

पाकिस्तानपासून पळण्याची भारताची जुनीच सवय आहे. यात नवं असं काही नाही. मी खेळत होतो तेव्हापासून त्यांना ओळखतो असंही जावेद मियाँदादने म्हटलं.

पाकिस्तानपासून पळण्याची भारताची जुनीच सवय आहे. यात नवं असं काही नाही. मी खेळत होतो तेव्हापासून त्यांना ओळखतो असंही जावेद मियाँदादने म्हटलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

कराची, 06 फेब्रुवारी : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक जावेद मियाँदादने बीसीसीआयवर सडकून टीका केलीय. इतकंच नाही तर त्याने असाही दावा केला की, 'भारताला पाकिस्तानची नेहमीच भिती वाटते.' बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे की, आशिया कप २०२३ साठी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानमध्ये जाणार नाही. त्यामुळे आता आशिया कप युएईमध्ये हलवण्यात यावा.

बीसीसीआयने म्हटंल की, आशिया कपचं यजमानपद पाकिस्तानकडे असावं पण ठिकाण तटस्थ असायला हवं. यावर पीसीबीने धमकी दिली की जर असं झालं तर पाकिस्तान क्रिकेट संघ २०२३ च्या वर्ल्ड कपसाठी भारतात जाणार नाही. आयसीसी वर्ल्डकप २०२३ भारतात आयोजित केला जाणार आहे.

हेही वाचा : लता दीदींच्या आठवणीत भावुक झाला क्रिकेटचा देव

जावेद मियादाँदने म्हटलं की, "भारताला पाकिस्तानविरुद्ध खेळायची भिती का वाटते? त्यांना माहितीय जर भारत पाकिस्तानकडून हरला तर नरेंद्र मोदी गायब होतील. त्यांना जनता सोडणार नाही." इतकंच नाही तर जावेद मियादाद असंही म्हणाला की, भारत शारजाहमध्ये जेव्हा आम्ही जिंकायला लागलो तेव्हा पळून गेला. ते आम्हाला खेळू देणार नव्हते. आमच्याकडून पराभव झाला की, तिथले लोक आपल्याच खेळाडूंच्या घरात आग लावत होते. गावस्कर यांच्यासह त्यांच्या खेळाडूंना आमच्याकडून पराभवाचं मोठं नुकसान सहन करावं लागत होतं.

पाकिस्तानपासून पळण्याची भारताची जुनीच सवय आहे. यात नवं असं काही नाही. मी खेळत होतो तेव्हापासून त्यांना ओळखतो असंही जावेद मियाँदादने म्हटलं. आशिया कप २०२३ कुठे होईल आणि पाकिस्तानचा संघ २०२३ च्या आयसीसी वर्ल्ड कपमधून माघार घेणार का याचं उत्तर येत्या काळात मिळेल.

First published:

Tags: Cricket