मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

MS Dhoni: महेंद्रसिंग धोनी IPL मधूनही रिटायर्ड होणार? रविवारी करणार मोठी घोषणा, पाहा धोनीची ‘ती’ पोस्ट

MS Dhoni: महेंद्रसिंग धोनी IPL मधूनही रिटायर्ड होणार? रविवारी करणार मोठी घोषणा, पाहा धोनीची ‘ती’ पोस्ट

धोनी रविवारी करणार मोठी घोषणा

धोनी रविवारी करणार मोठी घोषणा

MS Dhoni: 2020 साली धोनीनं अचानकपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यावेळी तर तमाम भारतीय क्रिकेट रसिकांना धक्का बसला होता. त्यामुळे धोनी उद्या आणखी कोणती मोठी घोषणा करतो याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

मुंबई, 24 सप्टेंबर: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या क्रिकेटपासून दूर आहे. पण धोनीनं आज एक पोस्ट करत चाहत्यांना कोड्यात टाकलं आहे. धोनी रविवारी दुपारी एक मोठी घोषणा करणार असल्याची ही पोस्ट आहे. तुम्हाला आठवत असेल 2020 साली धोनीनं अचानकपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यावेळी तर तमाम भारतीय क्रिकेट रसिकांना धक्का बसला होता. त्यामुळे धोनी उद्या आणखी कोणती मोठी घोषणा करतो याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

फेसबुकवर धोनी येणार लाईव्ह

धोनी सोशल मीडियावर फार कमी अक्टिव्ह असतो. पण तरीही धोनीची लोकप्रियता अफाट आहे. अशात जर धोनी फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्मवर लाईव्ह येत असेल तर बातमी मोठी आहे यात शंकाच नाही. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये धोनीनं 25 सप्टेंबरला दुपारी दोन वाजता काहीतरी खास शेअर करणार असल्याचं म्हटलं आहे. धोनीच्या या पोस्टवर चाहत्यांनीही हजारो कमेंट आतापर्यंत दिल्या आहेत.

धोनीच्या या पोस्टनंतर अनेक अंदाज बांधले जात आहेत. कुणी म्हणतंय धोनी आयपीएल संदर्भात कोणती तरी घोषणा करणार आहे. तर काही जणांचा अंदाज आहे की टी20 वर्ल्ड कपआधी धोनी टीम इंडियाशी जोडला जाणार आहे. पण खरं काय आहे हे धोनीच्या त्या फेसबुक लाईव्हनंतरच कळेल.

अचानकपणे घेतला होता क्रिकेटमधून संन्यास

15 ऑगस्ट 2020 ही तारीख भारतातल्या प्रत्येक क्रिकेटरसिकाला आठवत असेल. याच दिवशी संध्याकाळी बरोबर 7.29 वाजता धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तेव्हापासून धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत आहे. पण उद्या धोनी काय घोषणा करणार याची उत्सुकता आता प्रत्येकालाच आहे.

First published:

Tags: Cricket news, Csk, MS Dhoni, Sports