मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /अवघ्या 40 रुपयांत गुडघ्यांवर उपचार करतोय MS Dhoni; वैद्यांचं झाडाखाली ट्रिटमेंट सेंटर

अवघ्या 40 रुपयांत गुडघ्यांवर उपचार करतोय MS Dhoni; वैद्यांचं झाडाखाली ट्रिटमेंट सेंटर

महेंद्रसिंह धोनी सध्या गुडघेदुखीनं त्रस्त आहे. त्यासाठी त्यानं एखाद्या रुग्णालयाची पायरी चढली नाही, तर रांचीजवळच्या (Ranchi) एका वैद्यांची मदत घेतली आहे.

महेंद्रसिंह धोनी सध्या गुडघेदुखीनं त्रस्त आहे. त्यासाठी त्यानं एखाद्या रुग्णालयाची पायरी चढली नाही, तर रांचीजवळच्या (Ranchi) एका वैद्यांची मदत घेतली आहे.

महेंद्रसिंह धोनी सध्या गुडघेदुखीनं त्रस्त आहे. त्यासाठी त्यानं एखाद्या रुग्णालयाची पायरी चढली नाही, तर रांचीजवळच्या (Ranchi) एका वैद्यांची मदत घेतली आहे.

    नवी दिल्ली, 1 जुलै : भारतीय क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (M. S. Dhoni) वेगवेगळ्या कारणांनी सतत चर्चेत असतो. त्याच्या प्राणीप्रेमाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता मात्र धोनी एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. गुडघेदुखीवरच्या (Medicine On Knee Pain) उपचारांसाठी त्यानं चक्क झाडाखाली बसणाऱ्या एका वैद्यांचं औषध घेतलं आहे. मोठमोठे खेळाडू खरं तर त्यांच्या दुखण्यांसाठी बड्या रुग्णालयांमध्ये धाव घेतात. मात्र धोनीनं रांचीमधील एका वैद्यांकडे औषध घेतलं आहे. आज तक हिंदीनं याचं सविस्तर वृत्त दिलं आहे.

    महेंद्रसिंह धोनी सध्या गुडघेदुखीनं त्रस्त आहे. त्यासाठी त्यानं एखाद्या रुग्णालयाची पायरी चढली नाही, तर रांचीजवळच्या (Ranchi) एका वैद्यांची मदत घेतली आहे. झारखंडची (Jharkhand) राजधानी रांचीपासून 80 किलोमीटर लांब असलेल्या लापूंगच्या गलगली धाममध्ये वैद्य बंदन सिंह खेरवार आहेत. झाडाखाली बसून हे वैद्य रुग्णांवर उपचार करतात. भारताचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी याच वैद्यांकडून उपचार घेतो. आजवर चार वेळा तो इथं येऊन औषध घेऊन गेला आहे. धोनीचे आई-वडीलही याच वैद्यांकडून औषधं घेतात. या औषधामुळे धोनीला गुडघेदुखीवर चांगला आराम पडल्याचं सांगितलं जातंय.

    जंगली वनस्पतींचा वापर करून हे वैद्य औषध तयार करतात. गाईचं दूध, झाडांची साल व काही औषधी वनस्पती यांचा उपयोग ते औषधं तयार करण्यासाठी करतात. विशेष म्हणजे औषधासाठी म्हणून ते लोकांकडून केवळ 20 रुपये फी घेतात. धोनीकडूनही त्यांनी केवळ 40 रुपयेच घेतले आहेत.

    या वैद्यांकडे शेजारच्या राज्यांमधूनही अनेक जण औषध घ्यायला येतात. हे औषध प्यायल्यामुळे सांधेदुखी कायमस्वरुपी बंद झाल्याचं रुग्णांचं म्हणणं आहे. धोनी कोणताही बडेजाव न बाळगता इतर रुग्णांप्रमाणेच आपल्याकडे येत असल्याचं वैद्य सांगतात. धोनीला मोठी असामी होण्याचा कोणताही गर्व नसल्याचं ते म्हणतात. धोनी इथल्या वैद्यांकडे यायला लागल्यापासून त्याच्या चाहत्यांनीही इथे गर्दी करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता धोनी इथे आल्यावर गाडीतून न उतरता औषध घेऊन तसाच निघून जातो. गेल्या महिन्याभरात गावातील अनेकांनी धोनीसोबत फोटो काढले आहेत.

    महेंद्रसिंह धोनीची लोकांमध्ये खूप क्रेझ आहे. त्याच्या खेळावरच नाही, तर त्याच्या खासगी आयुष्यातील गोष्टींवरही चाहते कौतुकानं चर्चा करतात. आजवर महेंद्रसिंह धोनी हा साधा माणूस असल्याचं ऐकलं असेल; पण आता त्याच्या या कृतीतून त्यानं त्याचा साधेपणा दाखवला आहे. इतका मोठा खेळाडू असूनही त्याचं त्याच्या गावावरचं प्रेम कमी झालेलं नाही. त्याचा नम्र स्वभाव आणि साधेपणाच चाहत्यांना अधिक भावतो आहे.

    First published:
    top videos

      Tags: Cricket, Cricket news, Jharkhand, Medicine, MS Dhoni