मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

रडू नकोस म्हणत पुसले अश्रू, दिव्यांग फॅनला बघून MS Dhoni झाला इमोशनल, VIDEO

रडू नकोस म्हणत पुसले अश्रू, दिव्यांग फॅनला बघून MS Dhoni झाला इमोशनल, VIDEO

टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीची (MS Dhoni) इमोशनल बाजू पहिल्यांदाच जगासमोर आली आहे. रांची विमानतळावर धोनीला त्याची दिव्यांग चाहती लावण्या भेटली होती.

  • Published by:  Shreyas
रांची, 31 मे : टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीची (MS Dhoni) इमोशनल बाजू पहिल्यांदाच जगासमोर आली आहे. रांची विमानतळावर धोनीला त्याची दिव्यांग चाहती लावण्या भेटली होती. लावण्याने धोनीसोबतच्या या भेटीचा अनुभव शेअर केला आहे. लावण्याने इन्स्टाग्रामवर धोनीसोबतच्या भेटीचे फोटो आणि एक व्हिडिओ शेयर केला आहे. धोनीला पाहून लावण्या रडायला लागली तेव्हा खुद्ध धोनीने तिचे अश्रू पुसले आणि रडू नकोस, असं सांगितलं. एमएस धोनीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन बराच काळ झाला आहे, पण त्याच्या फॅन फॉलोइंगमध्ये अजिबात कमी झालेली नाही. धोनीचे चाहते नेहमीच त्याच्याबद्दलचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.. धोनीही जेव्हा चाहत्यांना भेटतो तेव्हा त्यांच्याशी प्रेमाने बोलतो. भारताला 2 वर्ल्ड कप आणि एक चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून देणाऱ्या धोनीने रांची विमानतळावर लावण्याची भेट घेतली. या भेटीमध्ये लावण्या पिलानियाने धोनीला त्याचं एक स्केच गिफ्टही दिलं. मी हे गिफ्ट घेऊन जाईन, असं धोनी आपल्याला म्हणाल्याचं लावण्याने सांगितलं.
'धोनीला भेटल्याची भावना मी शब्दांमध्ये सांगू शकत नाही. तो दयाळू आणि मृदुभाषी आहे. त्याने मला माझ्या नावंच स्पेलिंग विचारलं. मी जेव्हा त्याला पाहून रडायला लागले तेव्हा त्याने मला रडू नकोस, असं सांगितलं आणि माझे अश्रू पुसले. मी दिलेल्या स्केचबद्दल तो मला धन्यवाद म्हणाला, तसंच हे गिफ्ट मी घेऊन जातोय, असंही त्याने मला सांगितलं. त्याचे हे शब्द कायमच माझ्या आठवणीत राहतील,' असं लावण्या तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणाली आहे.
First published:

Tags: MS Dhoni

पुढील बातम्या